‘बिग बॉस मराठी 4’ च्या यंदाच्या आठवड्यात डबल एलिमिनेशन पार पडलं.शनिवारी विकास सावंत बिग बॉसच्या घराबेहर पडला आणि आज अमृता देशमुख.
अमृता देशमुखचा बिग बॉस मधील प्रवास आज संपला आहे. बाहेर पडताना अमृताला अश्रू अनावर झाले.अमृताला आता बिग बॉसच्या घरात पाहता येणार नाही म्हटल्यावर तिचे चाहते दुःखी झाले आहेत.
‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व संपायला अवघे 21 दिवस शिल्लक राहिले आहेत.‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात आता फक्त 8 स्पर्धक उरले आहेत.बिग बॉसचा शो आता रंजक वळणावर आला असून बाहेर जाण्याचा पुढचा नंबर कोणाचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.