भारत-चीन यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना, भारताने शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या ‘अग्नि-5’ या शक्तीशाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. आता हे क्षेपणास्त्र रात्रीही हल्ला करण्यास सक्षम आहे. तब्बल पाच हजार किलोमीटर पेक्षा अधिक दूरचे लक्ष्य भेदण्याची यामध्ये क्षमता आहे. पहिल्यांदाच हे क्षेपणास्त्र त्याच्या पूर्ण अंतरावर डागण्यात आले.ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरील अब्दुल कलाम चाचणी केंद्रात ही चाचणी घेण्यात आली. ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरील अब्दुल कलाम चाचणी केंद्रात ही चाचणी घेण्यात आली.
संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले की, क्षेपणास्त्रावर नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणं वापरण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत आवश्यकता भासल्यास रेंज वाढवण्याची क्षमता सिद्ध केली आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनेमिक्स लिमिटेडने संयुक्तपणे विकसित केले आहे.
याशिवाय, नव्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाच हजार ते आठ हजार किलोमीटर पर्यंत आहे. अग्नि 5 क्षेपणास्त्राची उंची १७ मीटर आहे, ५० टन वजनाचे हे क्षेपणास्त्र १.५ टन पर्यंत अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. याशिवाय ध्वनीच्या २४ पेट वेगाशी हे क्षेपणास्त्र स्पर्धा करू शकते.
इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल(ICBM) अग्नि-5 शिवाय, अग्नि शृंखलेत भारतीय शस्त्रागारात अग्नि-1, अग्नि-2, अग्नि-3 , अग्नि-4 आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राचा समावेश आहे.