राजकीय नेत्यांची विरोधकांवर टीका करताना पातळी घसरत चालली आहे. आता उद्धव ठाकरे यांची आतेबहिण कीर्ती पाठक यांची भाजपवर टीका करताना जीभ घसरली आहे. ‘भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती केली असून काही अंतराने त्यातील एक जण भुंकतो. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो. त्याच रिमोट दिल्लीत आहे. मुळात हे सर्व स्क्रिप्टेड असतं’, अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही कीर्ती पाठक यांनी केली आहे. कीर्ती पाठक या उद्धव ठाकरेंच्या आतेबहिण आणि ठाकरेंच्या चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस आहेत. सांगलीच्या मिरजमध्ये त्या बोलत होत्या.
कीर्ती पाठक यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. ‘स्वाभीमान हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसावा. आम्ही त्यांना गद्दार गट हे नाव दिलं आहे, ते त्यांच्या कपाळावर कायम बसलं आहे,’ अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली आहे.