बोमन इराणी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील असेच एक अभिनेते आहेच ज्यांनी आपल्या शानदार अभिनय आणि कॉमिक टायमिंगच्या बळावर लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.’3 इडियट्स’चा व्हायरस असो किंवा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा डॉ. अस्थाना असो, बोमन इरानी यांनी प्रत्येक भूमिकेची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.
आज बोमन यांचा वाढदिवस असून ते आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहेत.बोमन इराणी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी ते वेटरचे काम करायचे.बोमन यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दोन वर्षे वेटर आणि रूम सर्व्हिस कर्मचारी म्हणून काम केले आहे.
यानंतर, अभिनेत्याने आपल्या कुटुंबासह काम करण्यास सुरुवात केली आणि 14 वर्षे आईसोबत बेकरीमध्ये काम केले. पण बोमन इराणींच्या नशिबी काहीतरी वेगळंच होतं आणि एका कोरिओग्राफरच्या भेटीने त्यांचं आयुष्य बदलून गेलं.कोरिओग्राफर श्यामकच्या सांगण्यावरुन बोमन यांनी थिएटर करायला सुरुवात केली. त्यांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळू लागला.
2001 मध्ये त्यांना दोन इंग्रजी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ‘वीरबादी सेज आय एम फाइन’ आणि ‘लेट्स टॉक’ हे चित्रपट होते. त्यानंतर वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.