मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली घाटात भीषण अपघात, 2 कंटेनर 100 फूट खोल दरीत कोसळले

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला आहे. खोपोली घाटात दोन कंटेनर शंभर फूट खाली कोसळले आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे. या अपघातात काहीजण जखमी आहेत. अग्निशमन दलाच्या जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबई लेनवर हा अपघात झाला असून अजून काही जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही गाड्यांची एकमेकांची ठोकर लागल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितलं जात आहे. यातील एक कंटेनर सामानाने भरलेला होता. आतापर्यंत एक मृतदेह सापडला असून आणखी यात अडकलेले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

शंभर फूट खाली गेलेल्या दोन्ही गाड्यांना आणि त्यातील काही अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पहाटे चार ते साडेचार वाजता हा अपघात झाला असून दरी खूप खोल असल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. पोलीस घटनास्थळी असून पुढील घटनेचा तपशील काही वेळात करणार आहेत.

शेती काम करताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

रोटाव्हेटरमध्ये अडकून सुरज भवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नांदुरढोक शिवारात घडली. भवार हा शेतात रात्री ट्रॅक्टरने रोटाव्हेटर मारत होता. त्यावेळी रात्री रोटाव्हेटरची सेंटिंग करत असताना रोटाव्हेटरमध्ये अडकून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.