लॉकडाऊन दरम्यान बेरोजगार झालेल्या लोकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकार टेलरिंग शॉप योजना चालवित आहे. याअंतर्गत अनुसूचित जाती आणि गरीब तरुण आणि महिलांना शिवणकामासाठी सुमारे 20 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे. याद्वारे आपण घरुन स्व-रोजगार करु शकता.
या योजनेत दहा हजार रुपये अनुदान म्हणून दिले जातात, तर उर्वरित दहा हजार रुपये व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले जातात. एवढेच नव्हे तर या योजनेंतर्गत शिवणकाम आणि भरतकाम काम सुरु करणार्यांना टेलरिंगचे प्रशिक्षणही दिले जाते. यासाठी नोंदणी करावी लागते. ही योजना काय आहे आणि त्याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील तरुण आणि महिला सहाय्यक आणि ग्रामविकास अधिकारी, समाज कल्याण विभाग, सहाय्यक व्यवस्थापक व विकास भवन स्थित विभाग यांच्याशी संपर्क करु शकतात. येथे त्यांना योजनेशी संबंधित फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावयाची आहेत.
टेलरिंग शॉप योजनेंतर्गत दहा हजार रुपयांचे कर्ज वित्त विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांला दिले जाईल. विशेषबाब म्हणजे लाभार्थ्याला त्यामध्ये कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर कर्जाची मूळ रक्कम परत करण्यासाठी त्यांना तीन वर्षांचा पुरेसा कालावधी मिळेल. अर्जदारांना त्यांची कर्ज हप्त्यांमध्येही परत करता येईल.
युपी टेलरिंग योजनेंतर्गत जे लोक समाज कल्याण विभाग, उत्तर प्रदेशच्या कुटुंब कल्याण योजना किंवा राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत तयार केलेल्या बचत-गटांचे लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल. या व्यतिरिक्त विशेष अधिसूचित जाती प्रवर्गातील गरीब तरुणांना या योजनेत समाविष्ट केले जाईल.