लग्नाचे सर्वाधिक शुभ मुहूर्त मे महिन्यात

हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त मानला जातो. हिंदू धर्मात, विवाह हे एक असे कार्य आहे जे केवळ दोन लोकांमध्येच घडत नाही तर दोन कुटुंबांना जोडते. म्हणूनच लग्नाशी संबंधित सर्व शुभ कार्ये शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहून केल्या जातात. वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून ग्रहांची स्थितीपासून ते त्यांचे किती गुण मिळतात या सर्वांचं मूल्यांकन केले जाते.

हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी लग्नाचे सर्वाधिक शुभ मुहूर्त मे महिन्यात येत आहे. लग्नाच्या बाबतीत गुरु आणि बुध महत्त्वपूर्ण मानले जातात. ज्योतिशास्त्राच्या मते जेव्हा शुक्र तारा अस्त होतो तेव्हा विवाहसंबंधी कार्य केले जात नाहीत. याशिवाय खरमासमध्येही कोणतेही शुभ कार्य होत नाही.

पंचागानुसार, यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नासाठी कोणताही शुभ काळ नव्हता. 22 एप्रिलपासून लग्नाचे शुभ मुहूर्त सुरु झाले आहे. वास्तविक 28 एप्रिलपासून वैशाख महिना सुरु झाला आहे. हा महिना सर्वोत्तम मानला जातो. कोणतेही शुभ कामे करण्यासाठी हा महिना सर्वात शुभ आहे.

चला मे महिन्यात लग्नाच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया –
2 मे
4 मे
7 मे
8 मे
21 मे
22 मे
23 मे
24 मे
26 मे
29 मे
31 मे

कधी विवाह केले जात नाहीत

धार्मिक मान्यतेनुसार, मांगलिक कामे खरमास, मलमास, गुरु आणि शुक्रा तारा अस्त झाल्यानंतर आणि देवशयनीच्या वेळी शुभ कार्य केले जात नाहीत. केवळ विवाहच नाही तर इतर शुभ कामंही या केली जातात. तथापि, लग्नाचा शुभ काळ 22 एप्रिलपासून सुरु झाला आहे. यावर्षी 15 जुलैपूर्वी म्हणजे देवशयनपूर्वी 37 विवाह मुहूर्त आहेत. त्यानंतर 15 नोव्हेंबरला देवउठनी एकादशीपासून 13 डिसेंबरपर्यंत लग्नासाठी शुभ मुहूर्त राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.