आयसीसी टि२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियामध्ये होत असून या संपूर्ण विश्वचषकात पाऊस मात्र व्हिलन म्हणून आडवा येताना दिसतो आहे. पाऊस हा विश्वचषकात गेम चेंजर ठरत आहे. आतापर्यंत चार सामने हे या विश्वचषकात पावसामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस गोंधळ घालणार का, याबाबतचे माहिती आता समोर आली आहेत.विश्वचषकातील चार सामने आतापर्यंत पावसामुळे वाया गेले आहेत, यामधील तीन सामन्यांमध्ये तर पावसामुळे नाणेफेक सुद्धा झाली नाही. त्यामुळे पाऊस हा या विश्वचषकात सर्वात महत्वाचा घटक ठरत आहे. शनिवारी पर्थमध्ये चांगलाच पाऊस झाला आहे. त्यामुळे आता रविवारीदेखील पाऊस पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थ येथे खेळला जाणार आहे. हा सामना जो जिंकेल तो उपांत्य फेरी गाठणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. भारत सुपर-१२ चे पहिले दोन्ही सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. पर्थची खेळपट्टी पाहिली तर वेगवान आणि उसळी घेणारी आहे, हेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हवे आहे. यामुळे केवळ दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजच भारताची कसोटी पाहतील असे नाही. त्यांच्या संघातील एक फलंदाज भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.
पाकिस्तान आणि नेदरलँडवर मात केल्यानंतर रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज झाली आहे ती सुपर 12 मधल्या आणि एका मोठ्या लढतीसाठी. भारतासमोर रविवारी आव्हान असेल ते तेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिकेचं. ग्रुप 2 मधील भारताचा हा तिसरा सामना पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यात भारतीय संघात काही बदल होणार का? रोहित शर्मा सलामीला अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी देणार का? असे प्रश्न सध्या चाहत्यांना पडले आहेत.
भारत वि. दक्षिण आफ्रिका
सुपर 12, ग्रुप 1 मॅच
ऑप्टस स्टेडियम, पर्थ
संध्याकाळी 4.30 वा.
थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डिस्ने हॉट स्टारवर
संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कॅप्टन), लोकेश राहुल/रिषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ – तेम्बा बवुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, रायली रुसो, एडन मारक्रम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, एनरिच नॉकिया, केशव महाराज, तबरेज शम्सी