कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशात व विशेषतः महाराष्ट्रात थैमान घातलेले असतांना बँका व अनेक खाजगी कर्जपुरवठादार वितीय संस्था लॉकडाऊनमध्येही सक्तीची वसुली करीत असल्याचे निदर्शनास आल्याने तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाव्दारे अशा वसुलीला कोरोना स्थिती सामान्य झाल्यानंतर दोन महिन्यापर्यत स्थगिती देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलास द्यावा, अशी मागणी केली होती. सदर मागणीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वित्त विभाग महाराष्ट्र शासनाकडे सदर मागणीवर तात्काळ कार्यवाही करण्याचे सूचित केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
बँक कर्जे, बचत गटाला दिलेली कर्जे बचत गटात दिलेली व्यक्तीगत कर्जे व खाजगी फायनान्स कर्ज हपे वसुलीस लॉकडाऊन कालावधीत व त्या पुढील दोन महिने स्थगिती देण्याचे आदेश देऊन कर्जदार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन दि. २४ एप्रिल २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. त्यावर निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी वित्त विभाग महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आल्याचा संदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून दि. २७ एप्रिल रोजी प्राप्त झाला आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूने महाराष्ट्रात हाहाकार उडवीला असल्याने राज्यातील जनतेच्या रक्षणाच्या उद्दात हेतूने आपण राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला, सदर निर्णयास अनुसरून राज्यातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु राज्यातील अनेक लघु व्यवसायिकांचे व्यवसाय ठप्प झाल्याने आपल्या कुटुंबाचे व स्वतःचे रक्षण करण्याकरिता घरातच थांबून असल्याने उदरनिर्वाहाचा व दैनदिन खर्चाचा बोजा त्यांच्या अंगावर पडला आहे. अनेक लघु व्यवसायिकांनी विविध बँका बचत गट व काही खाजगी फायनान्स कंपन्याकडून मासिक परतफेडीचे हफ्ते पाडून परतफेड करण्याचे करार करून कर्जे घेतलेली आहेत. गतवर्षीपासून गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये झालेले व्यवसायिक नुकसान व चालू वर्षात सुरु यावर्षी सुद्धा ठप्प झालेले व्यवहार या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक कुटुंबाच्या उदरनि्वाहाच्या चिंतेने ग्रस्त असतांना विविध बँका, खाजगी फायनान्स कंपन्या या बाबीचा विचार न करता कर्जदार नागरिकांना त्यांच्याकडील कर्जाचे मासिक हमे भरण्यासाठी तगादा लावत सत्ती करत असल्याच्या काही बाबी समोर येत आहे.
आलेला कोरोनाचा कहर व लॉकडाऊनमध्ये कर्ज वितरकांच्या वसुलीची लहर सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून आशा परिस्थितीत त्यांचा लॉकडाऊनवर रोष अनावर होत असल्याने नागरिक बंड करून उठण्याची स्थिती निर्माण होत आहे. तसे झाले तर राज्यात कोरोना महामारीचा कहर अजून वाढण्यास ही बाब कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी बैंक कर्जे, बचत गटाला दिलेली कर्जे बचत गटात दिलेली व्यक्तीगत कर्जे व खाजगी फायनान्स कर्ज हमे वसुलीस लॉकडाऊन कालावधीत व परिस्थिती सामान्य होई पर्यंत व त्या पुढील दोन महिने वसुलीस स्थगिती देण्याचे आदेश देऊन कर्जदार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती केलेली आहे.
- राजकीरण देशमुख, नांदेड/माहूर