भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजप सरकारने देशाला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाचव्या नंबरवर आणल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. ज्या इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं त्यांनादेखील भारताने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मागे टाकलं, असादेखील दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमात त्यांनी संबंधित विधान केलं आहे.
“आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. असं असतानादेखील दोनवेळचं जेवण मिळत नव्हतं. त्यावेळी हरित क्रांतीच्या माध्यमातून सर्वाधिक शेतीमालाचा उत्पादन भारतात करण्यात आले. शेती मालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने काही अडचणी निर्माण झाल्या. यावर उपाय म्हणून देशात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाला. आज 12 कोटी लोक या उद्योग क्षेत्रात काम करतात. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आम्ही आता पाचव्या नंबरवर आलो आहोत. 150 वर्ष आमच्यावर राज्य करणाऱ्या इंग्लंडला देखील आम्ही आता मागे टाकलं आहे”, असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
“अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी संशोधन आणि विज्ञानामध्ये क्रांती झाली पाहिजे. काही नवीन अभ्यासक्रम आता आम्ही सुरू करत आहोत, जेणेकरून शिक्षण बरोबर व्यक्तिमत्त्व देखील विकसित झालं पाहिजे. स्किल डेव्हलपमेंटचे विषय देखील राज्यातील विद्यापीठांनी घ्यावे. 31 डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकचे शिक्षण मराठीतून मिळणार. इंग्रजीमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाला देखील मराठीसाठी डिव्हाईस देण्यात येणार आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“एकेकाळी देशात सोन्याचा धूर निघत होता. देशात येऊन ते लुटून नेण्यात आले आणि आमच्यावर आरोप झाले की आम्ही बुरसटलेल्या विचारांचे आहोत. उलट आम्ही सर्वांचे स्वागत केले. आम्ही कुणावर अन्याय केला नाही. सर्वांना आम्ही चर्च, मस्जिद आणि मंदिर बांधण्यासाठी जागा दिल्या. आम्ही कुणावर आक्रमण केले नाही. आम्ही आक्रमण केले असते तर जगात काही शिल्लक राहिलं नसतं”, असादेखील दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
“पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे शिक्षण मराठी मातृभाषेतून देण्याचा प्रयत्न आहे. दिल्याने विषयाचे नीट आकलन होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषामधून शिक्षण घेण्याचं धोरण स्वीकर्णयात आले. महाराष्ट्र 171 महाविद्यालयात पोलिस्टक्निकचे शिक्षण मराठीत सुरू झाले आहे. पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर अखेर प्रयत्न सर्व पुस्तक मराठी भाषेत मिळणार. विद्यार्थ्यांना विषय समजायला सोपा जाणार, त्याला डिव्हाईस दिला जाईल. इंग्रजीमधून शिकवले तरीही त्याला भाषांतर करून मराठीमध्ये विषय कळणार. विद्यार्थी मातृभाषामध्ये परीक्षा देऊ शकतील. यावर विचार सुरू आहेत. टप्याटप्प्याने दुसऱ्या वर्गासाठी सुरु करणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.