दुर्गामाता विसर्जना वेळी नदीला अचानक पूर 7 जणांचा मृत्यू 

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गामुर्ती विसर्जना वेळी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल(दि.05) बुधवारी संध्याकाळी जलपाईगुडी जिल्ह्यातील मलबाजार भागातील माल नदी परिसरात घडली. दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.05) बुधवारी सायंकाळी दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीवर मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते. या दरम्यान अचानक पाण्याची पातळी वाढू लागली. यामुळे लोकांची तारांबळ उडाली, बघता बघता यामध्ये सात जणांचा बुडून मृत्यू झाला तर 40 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू केले आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अनेक लोक मूर्ती विसर्जनासाठी नदीत उतरताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली, लाटा इतक्या वेगाने वाढल्या की अनेक लोक त्यात अडकले आणि वाहू लागले. घटनास्थळी आरडाओरडा होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

माळ नदीत बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. मूर्ती विसर्जनाच्या वेळी अपघातात भाविकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही असे अनेक अपघात घडले आहेत.रात्री नऊच्या सुमारास दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी माळ नदीवर मोठ्या संख्येने लोक गेले असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी पाण्याची पातळी जास्त नव्हती, अचानक पाण्याची पातळी वाढल्याने लोक पाण्याच्या प्रवाहात अडकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.