कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या 18 व्या षटकात दिनेश कार्तिकने ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर कव्हरच्या डोक्यावरुन मारण्याचा प्रयत्न केला, पण तेथे फिल्डिंग करत असलेल्या चेतन साकारीयाने हवेत उडी मारणारा झेल पकडला. हवेत सूर मारुन चेतन साकारियाने दिनेश कार्तिकचा अतिशय कठीण झेल घेतला.
दिनेश कार्तिकचा झेल पकडल्यानंतर चेतन साकारीयाने आपले दोन्ही हात समांतर दिशेने पसरवून अनोख्या पद्धतीने साजरे केले. चेतन साकारियाने अप्रतिम झेल घेऊन दिनेश कार्तिकला तंबूत जायला भाग पाडले. चेतनच्या या कॅचबद्दल संघातील सहकाऱ्यांनी देखील त्याची भरभरुन स्तुती केली.
शनिवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. स्टार अष्टपैलू ख्रिस मॉरिसच्या तुफानी गोलंदाजीच्या बळावर राजस्थानने हा सामना जिंकला. राजस्थान रॉयल्सकडून ख्रिस मॉरिसने 4 षटकांत 23 धावा देऊन 4 बळी घेतले. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 34 धावा केल्या तर दिनेश कार्तिकने 25 धावा केल्या. याशिवाय नितीश राणाने 22 धावा केल्या. राजस्थानने 18.5 षटकांत चार विकेट्स गमावून 134 धावांचे लक्ष्य गाठले.