क्वीन एलिझाबेथ यांचं निधन; सम्राज्ञीच्या सन्मानार्थ भारत सरकारचा मोठा निर्णय

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं उपचारादरम्यान वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडवर शोककळा पसरली आहे. क्वीन एलिझाबेथ या एपिसोडिक मोबिलिटी आजाराने ग्रस्त होत्या. सर्वाधिक काळ इंग्लंडच्या महाराणी पदावर राहिल्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच भारत सरकारने आता ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने काय म्हटलं?

युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय, यांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. या दिवंगत सम्राज्ञीच्या सन्मानार्थ, भारत सरकारने 11 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

या दिवशी संपूर्ण भारतामध्ये ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकवला जातो, त्या सर्व इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावरच फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नाही, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Queen Elizabeth II यांना झालेला हा आजार काय?

वयाच्या 97 व्या वर्षी क्वीन एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आणि त्यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे एपिसोडिक मोबिलिटी. एपिसोडिक मोबिलिटी हा तसा कोणता आजार नाही तर शरीराची एक समस्या आहे. नावानुसारच मोबिलिटी म्हणजे हालचाल आणि एपिसोडिक म्हणजे कधीतरी ज्यात सातत्य नसतं.  एपिसोडिक मोबिलिटवरूनच हालचाल करण्यात समस्या हे स्पष्ट होतं.

जसजसं वय वाढतं तसतसं स्नायू, सांधे आणि हाडांमध्ये समस्या उद्भवते. ज्यामुळे चालण्यात, उठण्याबसण्यात त्रास होतो. जसं की चालताना, खुर्चीवर बसताना आणि उठताना समस्या उद्भवते. काहींना ही समस्या नेहमीची असते. पण काहींना कधीतरी नीट हालचाल करता येते तर कधी नाही. हेच क्वीन एलिझाबेथ यांच्याबाबतीत होत होतं. यालाच एपिसोडिक मोबिलिटी म्हटलं जातं. या समस्येमुळे शारीरिक वेदनाही होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.