अमरावती पोलिसांनी अखेर करून दाखवलं, कथित लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी साताऱ्यात सापडली

अमरावतीमध्ये कथित लव्ह जिहाद प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता. अखेरीस या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. बेपत्ता असलेली मुलगी साताऱ्यात सापडली असून पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले आहे. लवकरच या मुलीला अमरावतीत आणले जाणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील 19 वर्षे तरुणी 2 दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर तिच्या मैत्रिणी ने दिलेल्या माहितीवरून ती सोहेल शहा नावाच्या युवकाच्या संपर्कात होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे कळतच कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि सोहेल शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतले या मुलीचा तातडीने शोध घ्यावा यासाठी भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धरणे आंदोलन सुद्धा केले.

जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा या प्रकरणात चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. या प्रकरणावरून नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. अखेरीस राजापेठ पोलिसांनी या युवतीचा शोध लावला असून ती सातारा येथे आढळलेली आहे. तिच्या संपर्कात भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आहेत. या तरुणीला लवकरच अमरावतीत आणले जाणार आहे.

पोलिसांनी मुलीचा सुखरूप शोध घेतल्याने आणि अमरावतीत परत आणत असल्याने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केलं आहे.

मुलीचा मोबाईल बंद होता मात्र जो युवक पोलिसांच्या ताब्यात होता त्यांच्या व तीच्या संभाषणावरून मुलगी ही साताराच्या दिशेने रेल्वेने जात असल्याचे पोलिसांना कळले. तेव्हा तत्काळ सातारा पोलीस आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून सदर मुलीला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

साताऱ्यातून तिला आणण्यासाठी अमरावतीचे पोलीस पथक रवाना झालेल आहे या मुलीला उद्या किंवा परवा अमरावतीत आणले जाणार,अशी माहिती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.