आज दि.४ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मर्सिडीज कार अपघातात मृत्यू

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि मोठे उद्योगपदी सायरस मिस्त्री यांचा पालघर येथे अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या कारला हा अपघात घडला होता. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मर्सिडीज गाडी डिव्हायरडला धडकल्याने अपघात झाला होता.गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा देत सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू होता.या घटनेमुळे देशाची प्रचंड मोठी हानी झाली आहे. या अपघाताच्या घटनेवर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ज्या उत्साहाने आमचं सरकार पाडलं….; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका

राज्यातील हे सरकार साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून ओरबाडून आणले गेले आहे. या लोकांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. मात्र, अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाही आहेत. ज्या उत्साहाने आमचे सरकार पाडलं गेलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.या सरकारच्या फक्त गाठीभेटी आणि गृह भेटी सोडून फारशा काही बातम्या दिसत नाहीत. तसेच त्यांचे जे दौरे दिसतात ते सुद्धा एक किलोमीटरच्या आतले असतात. ज्या ज्या वेळी मी टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, अशी टोमणाही सुप्रिया सुळे यांनी मांडला. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली.

रिलीजपूर्वी ब्रह्मास्त्र ने कमावला इतक्या कोटींचा गल्ला

दिग्दर्शक आयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. 2014 मध्ये जाहीर झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तशी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची क्रेझ वाढत चालल्याचं दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून तिकिट बुकिंग वेगाने सुरु असल्याचं दिसत आहे.’ब्रह्मास्त्र’च्या 65,000 हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. रिपोर्ट्समध्ये, अॕडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाचे एकूण कलेक्शन 2.55 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने आतापर्यंत अॕडव्हान्स बुकिंगमधून 4 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

‘यांना देशी कोंबडीचं इंजेक्शन द्या’, दुखापत होणाऱ्या क्रिकेटवर पाकच्या माजी क्रिकेटरचं खळबळजनक विधान

आशिया कपसाठी स्पर्धा सुरू आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान आज सामना होत आहे. या सामन्याआधी काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह सामना खेळू शकणार नाहीत. तर पाकिस्तानचे खेळाडू देखील दुखापतीने ग्रस्त झाले आहेत. त्याचा फटका पाकिस्तान टीमला बसणार आहे. याबाबत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने बोलताना खळबळजनक विधान केलं आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद हफीजने मॅनेजमेंटला अनोखा सल्ला दिला आहे. दोन सामने खेळून यांना दुखापत कशी होते. याचा अर्थ खेळाडूंना शिस्त नाही. त्यांचा आहार, व्यायाम, लाईफस्टाईल योग्य नसणार असंही तो म्हणाला आहे. दुखापत झालेल्या खेळाडूंना देशी कोंबडीचं इंजेक्शन देण्याचा सल्लाही त्याने दिला आहे.

दुबईच्या मैदानात रोहित शर्मा करणार वर्ल्ड रेकॉर्ड? किवी फलंदाजाला मागे टाकण्याची संधी

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधल्या अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टीत त्यानं अनेक विक्रम उभारले आहेत. आशिया चषकात रोहित शर्मा अशाच एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. 35 वर्षीय रोहित शर्मा हा पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मात्र महिला क्रिकेटमध्ये रोहितपेक्षा जास्त धावा न्यूझीलंडची फलंदाज सूझी बेट्सच्या नावावर आहेत. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितकडे तिलाही मागे टाकण्याची संधी आहे.रोहित शर्मानं आजवर सर्वाधिक 134 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 4 शतकं आणि 27 अर्धशतकांच्या मदतीनं एकूण 3520 धावा केल्या आहेत. रोहितची सरासरी 32 तर स्ट्राईक रेट 139 पेक्षा जास्त आहे. रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 315 चौकार आणि 165 षटकार ठोकले आहेत. रोहितची T20 मधील सर्वोत्तम धावसंख्या आहे 118. त्यानं 22 डिसेंबर 2017 ला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध ही धावसंख्या उभारली होती.

शिंदे सरकारवर 302 चे गुन्हे का दाखल करू नये? दानवेंचं जोरदार टीकास्त्र

शिंदे सरकार बुलेट ट्रेनमध्ये अडकले आहे. सरकारला शेतकरी आत्महत्येचं काही घेणं देणं नाही. या सरकारवर शेतकरी आत्महत्येबद्दल गुन्हा का दाखल करू नये?’ असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला.

सायरस मिस्री भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारं व्यक्तिमत्त्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशाचे सर्वात मोठ्या उद्योगपतींमधील एक असलेले सायरस मिस्त्री यांचं आज अपघाती निधन झालं आहे. सायरस मिस्त्री हे आपल्या मर्सिडीज कारने मुंबई-अहमदाबाद मार्गाने प्रवास करत होते. या दरम्यान पालघर जिल्ह्यात त्यांचं अपघातील निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत आपल्या संवेदना प्रकट केल्या.

सायरस मोदी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले की, “सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन हे धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक उद्योजक नेते होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.