शेतकऱ्यांसाठी साखर विभागाचं महत्त्वाचं पाऊल, आता घरबसल्या ऊस नोंदणी होणार

शेतकऱ्यांना घरबसल्या ऊस नोंदवण्यासाठी साखर विभागाने डिजीटल अभियान सुरू केलं आहे. अतिरिक्त उसाचं नियोजन वेळीच करण्यासाठी साखर आयुक्तालयाने हे पाऊल उचललं आहे. साखर आयुक्त कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी ऊस पिक नोंदणीसाठी “महा-ऊस नोंदणी” हे मोबाईल अॕप तयार करण्यात आले आहे. या मार्फत ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंदणी करणे शक्य नाही. असे शेतकरी या मोबाईल अॕपमार्फत स्वतः च्या ऊस क्षेत्राची नोंदणी करू शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात ऊस क्षेत्र नोंदणी केली आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती या अॕपमध्ये दिसून येईल.

ऊस नोंदणी कशी करायची?

सर्वप्रथम गूगल प्लेस्ट अर मधून “महा-ऊस नोंदणी (Maha-US Nondani)” हे अॕप डाउनलोड करून घ्या. QR Code आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करून आपण Google Play Store वरती जाऊ शकता. अॕप डाउनलोड केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्याकडील चालू हंगामातील ऊस क्षेत्राची माहिती नोंदवण्यासाठी “ऊस क्षेत्राची माहिती भरा” असे दिसून येईल. त्या ठिकाणी आपण बटन दाबा.

त्यानंतर “ऊस क्षेत्र नोंद करायवयाच्या शेतकऱ्याची माहिती” हे पेज दिसून येईल. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती भरा. आधार नंबर, पहिले नाव, मधले नाव शेवटी आडनाव भरावे. यानंतर पुढे या बटनावर क्लिक करा. यानंतर “ऊस क्षेत्र असलेल्या ठिकाणाची माहिती” हे पेज येईल. या ठिकाणी आपण प्रथम जिल्हा निवडवा. नंतर तालुका निवडवा, यानंतर गाव निवडावे. शेवटी गट नंबर/सर्वे नंबर टाकावा. यानंतर पुढे हे बटन दाबावे.

यानांतर “ऊस लागवडीची माहिती” हे पेज दिसून येईल यामध्ये आपण लागवड प्रकार निवडावा. ऊसाची जात निवडावी, लागवड दिनांक भरावा. नंतर ऊस क्षेत्र गुंठ्यामध्ये भरावे. यानंतर पुढे हे बटन दाबावे. नंतर “ऊस पिक उपलब्ध माहिती कोणत्या कारखान्यास कळवू इच्छिता” हे पेज दिसून येईल, यामध्ये आपण ज्या कारखान्यामध्ये ऊस नोंद करायची आहे, असे तीन कारखाने निवडावे. (कमीत कमी एक कारखाना निवडावा.). यानंतर “पुढे” हे बटन दाबा.

यानंतर आपणास धन्यवाद ..! असा मेसेज दिसून येईल आणि आपण निवडलेले कारखाने आपल्याला संपर्क करतील. यानंतर आपणास साखर कारखान्यातील आपली ऊस नोंद पाहण्यासाठी” असे दिसून येईल. या ठिकाणी आपण साखर कारखान्यात नोंदवलेला मोबाईल नंबर लिहावा. नंतर पुढे या बटनावर क्लिक करावे. इथे तुमची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.