निरज चोप्रा ने पुन्हा रचला इतिहास, लुसाने डायमंड लीग जिंकणारा ठरला पहिला खेळाडू

टोकीयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरजच्या कामगिरीने भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत पुन्हा धमाकेदार कामगिरी केली. लुसाने डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला.

७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ज्युरिख इथल्या डायमंड लीगमध्ये तो पोहोचला आहे. हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तो 2023 मध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे.

24 वर्षीय नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर लांब भाला फेकला. त्याच्या कारकिर्दीतील हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. दुखापतीमुळे तो बर्मिंगहॅम इथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.

नीरज मूळचा हरियातील पानिपत इथला आहे. डायमंड लीगचं विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू असल्याने त्याची जगभरात चर्चा होत आहे. चोप्रापूर्वी, डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.