‘सर्वच गोविंदांना सरकारी नोकरीचा लाभ मिळणार नाही’, मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणेवर भाजपचा घुमजाव?

दहीहंडी मंडळातील गोविदांना सरकारी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पण त्यांच्या या घोषणेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घुमजाव केला. सर्वच गोविंदांना आरक्षणचा लाभ घेता येणार नाही. फक्त शिकलेल्या गोविंदानाच पात्रतेनुसार आरक्षण मिळणार, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या संबंधित विधान करून खळबळ उडवून दिली. एकीकडे मुख्यमंत्री गोविंदांसाठी सरकरी नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करतात. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे घुमजाव करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला महत्त्व नाही का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

आरक्षण देतांना गोविंदाचे शिक्षण तपासलं जाईल. त्या आधारे त्यांना आरक्षणचा लाभ मिळेल. सरसकट गोविंदाना आरक्षण मिळणार नाही, असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्यात मतभेद होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

‘राज्यातील सर्वच निवडणुका शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करूनच’

दरम्यान, “येत्या निवडणुका आम्ही राज्यभर शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन युतीमध्ये निवडणुका लढवू. नगरपालिका पासून तर महानगरपालिका पर्यंतच्या सर्वच निवडणूक आम्ही सोबत लढणार आहोत आणि रेक्रोड ब्रेक विजय मिळविणार. भाजप येत्या काळात नंबर 1चा पक्ष होईल”, असा आशावाद चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.