शुक्रवारी मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपाच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप विरोध पक्ष सातत्याने करत आहे, यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. मात्र, पालिका निवडणूका जवळ आल्या की यांचे असे डायलॅाग सुरू होतात.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुनही राजकीय नेते त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. यावर फडणवीस म्हणाले, ‘मी सांगतो मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. पण आम्ही सांगतो की महाराष्ट्राच्या विकासासाठी मी आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाणार.’ यापुढे देवेंद्र फडणवीस यांनी डायलॅागमधून आधीच्या ठाकरे सरकारला टोला लगावला. ते म्हणाले, ‘मला अमिताभ बच्चन म्हटलं गेलं पण माझ शरीर हे अमजद खानसारखं आहे. मात्र, मी डायलॅाग बोलू शकतो. “कितने आदमी थे? 65 मै से 50 निकल गए !”’