जालन्यामध्ये आयकर विभागाने लोखंडी गज उत्पादन करणाऱ्या कारखानदारांच्या घरावर आयकर विभागाने छाप टाकला. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हातात मोठे घबाड लागले आहे. तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज सापडला आहे. एवढंच नाहीतर 300 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे.
जालन्यात आयकर विभागाने मोठी धाड टाकली. मागील 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होते. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली. आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या पथकां मार्फत एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने नवीन एमआयडीसी मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये तब्बल 390 कोटींची रोकड हाती लागली. ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 16 तास लागले.
जालन्यातील या चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवहारातून मिळवले आणि हे व्यवहार रोखीत केले, याची माहिती रेकॉर्डवर आणली नाही. त्यामुळे आयकर विभागाने अत्यंत गुप्तपद्धतीने हा छापा टाकला, असे वृत्त दिव मराठीने दिले.
या कारखानदारांच्या घरावर, कार्यालय, फार्महाऊस छापे टाकण्यात आले होते. एकाच वेळी पाच पथकांनी कारवाई केली. सुरुवातीला पथकाच्या हाती काही लागले नाही. पण नंतर जेव्हा पथकाने शहरापासून दूर असलेल्या फॉर्महाऊसवर धाड टाकली तेव्हा घबाड हाती लागले. कपाटाखाली, बिछान्यामध्ये पैशांची बंडलं सापडली. यामध्ये तीन कारखानदारांकडे रोख रक्कम सापडली. त्याचबरोबर सोन्याचे दागिने सोन्याचे बिस्किटे, विटा, नाणी आणि हिरे मिळाले. एकूण ३२ किलो सोनं हातात लागले.
एकूण सुमारे ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. तर औरंगाबादेतही दोन व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडून ५८ कोटी रोख जप्त केली आहे. यात १६ काटींचे सोन्याचे दागिने, हिरे आढळले आहे.