माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची आज जयंती

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची आज जयंती. 24 फेब्रुवारी 1948 रोजी एका अय्यर ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मात्र, त्यांनी ब्राह्मणविरोधासाठी राजकारणात आलेल्या अण्णा द्रमुक अर्थातच ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कड़गम पक्षाचे नेतृत्व केले. हे त्यांच्या कारकीर्दीचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. जयललिता यांनी जवळपास पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले. तर दुसरीकडे तेलगू, कन्नड, हिंदी, इंग्रजी या चित्रपटात अभिनेत्री (actress) म्हणून कारकीर्द गाजवली. चित्रपटामुळेच त्या एम.जी. रामचंद्रन यांच्या जवळ आल्या आणि तिथूनच 1982 मध्ये राजकारणात पाऊल ठेवले. अवघ्या वयाच्या दुसऱ्या वर्षी जयललिता वडिलांनी जग सोडल्यामुळे पोरक्या झाल्या.

कर्नाटकातल्या मेलुरकोट या छोटा गावातून आलेल्या. त्यानंतर बेंगळुरू आणि तमिळ सिनेमात चाचपडत-चाचपडत सुरुवात करणारी एक मुलगी, एका दिवशी राजकीय इतिहास निर्माण करेल, असे कोणाही राजकीय पंडिताला वाटले नसेल.

जयललिता यांनी शाळेत असतानाच चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यांनी 1961 मध्ये पहिला चित्रपट केला. तो इंग्रजी होता. त्याचे नाव होते ‘एपिलस’. वयाच्या पंधराव्या वर्षी कन्नड चित्रपटातून प्रमुख भूमिका करायला सुरुवात केली. त्यांचा कन्नड भाषेतला पहिला चित्रपट होता ‘चिन्नाडा गोम्बे’. जो 1964 मध्ये प्रसिद्ध झाला.

त्यानंतर त्यांनी तमिळ चित्रपट सृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. त्या काळात स्कर्ट घालून भूमिका करणारी पहिली अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. तमिळमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीधर यांच्या ‘वेन्नीरादई’ चित्रपटातून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. जवळपास 300 चित्रपट केले.

राजकारण उतरल्यानंतर त्यांना अपेक्षेप्रमाणे एम. जी. रामचंद्रन यांनी संधी दिली. पक्षाचा प्रोपोगंडा सचिव, त्यानंतर राज्यसभेची खासदारकी, आमदारकी अशी नाना पदे भूषवली. मात्र, या दोघांमध्ये पक्षांतर्गत विरोधकांनी फूट पाडली. त्यातच 1984 मध्ये एम. जी. रामचंद्रन गेले. त्यानंतर अण्णा द्रमुकचे दोन तुकडे झाले. एकीकडे एम. जी. रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी, तर दुसरी बाजू जयललिता यांनी सांभाळली.

त्यांनी स्वतःला एमजीआर यांचा राजकीय उत्तराधिकारी घोषित केले. त्यांच्या पक्षाने 1989 मध्ये विधानसभेच्या 27 जागा मिळवल्या. त्या विरोधी पक्षनेत्या झाल्या. 25 मार्च 1989 रोजी विधानसभेत जोरदार हंगामा झाला. त्यात विरोधकांनी जयललिता यांची साडी फाडली. हे सारे त्यांनी बाहेर माध्यमांसमोर येऊन सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतरच विधानसभेत पाय ठेवेन अशी शपथ घेतली. ती त्यांनी पूर्णही केली. त्यानंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला होता.

जयललिता यांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यांनी एकीकडे कल्याणकारी घोषणा केल्या. महिला सबलीकरणाला प्रोत्साहन दिले. मात्र, दुसरीकडे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 1988 मध्ये त्यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर बेकायदा संपत्तीप्रकरणी 1996 मध्ये त्यांच्यावर खटला चालला.

त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध केले. त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजेच 2014 मध्येही भ्रष्ट्राचार आणि बेकायदा संपत्तीप्रकरणी त्यांच्यावर खटला चालला. यातही त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध केले. त्यांनी केलेल्या साडी आणि सँडल खरेदीची अजूनही चर्चा होते.

जललिता यांनी दत्तक पुत्र सुधाकर यांचे चेन्नईमध्ये लग्न केले. 7 डिसेंबर 1995 मध्ये झालेला हा साही विवाह सोहळा चर्चेत राहिला. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चले. 50 एकरवर मंडप उभारला. तर दीड लाख पाहुण्यांनी हजेरी लावल्याचे बोलले जाते. जयललिता यांचा ज्योतिषावर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदली केला होता. त्यांना हिरवा रंग शुभ म्हणून सांगण्यात आला होता. त्यामुळे त्या सर्व वस्तू हिरव्या रंगाच्या वापरण्यासाठी प्राधान्य द्यायच्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.