विरोधात असले की ईडी लावता : सुप्रिया सुळे

नवाब मलिक यांना अटक आणि राज्यातला पॉलिटिकल ड्रामा यावर नेते भरभरून व्यक्त होत आहेत. काही वेळापूर्वीच विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी आणि नवाब मलिकांवर गंभीर आरोप करून गेले. अंडरवर्ल्डशी संबध असणाऱ्यांना वाचवणे अतिशय निदनिय आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काही थेट सवाल केले आहेत. अमित शहांना माझे दोन प्रश्न आहेत, विरोधात असले की ईडी लावता आणि तुमच्या पक्षात आले की ईडी गायब होते तुम्ही कोणते औषध वापरता ते सांगा, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शाह यांना सवाल केले आहेत. ईडीचा पेपर फुटतो त्यांच्यावर कारवाई का होत नाही? महाराष्ट्र खूप अडचणीच्या काळात चालला आहे. दिल्लीची माणसं महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. पण दिल्लीसमोर मोडेल पण वाकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावले आहे.

तसेच लढेंगे जरुर जितेंगे जरुर.आपल्याला ईडीची नोटीस आली की राज्यात आपले सरकार येते. पहिली नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात सरकार आले, झेडपीत आम्ही त्यांना झिरोवर आणणार आहे. काही लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते. असेही त्या म्हणाल्या. भाजपला उद्देशून बोलताना, आम्ही तुमच्यामागे ईडी वगैरे लावणार नाही. तिसरी नोटीस आली की देशात सत्ता येईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच देशामध्ये कोणीही आरोप केले तेव्हा इंदापूरमधील जनता साहेबांसोबत राहिली, अजितदादा आले की टॉनिक आणि साहेब आले की चव्यनप्राश मिळते असेही त्या म्हणाल्या.

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने मलिकांना आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याआधी ईडीकडून नवाब मलिकांची पहाटेपासून दुपारपर्यंत म्हणजे जवळपास आठ तास चौकशी करण्यात आली. राज्यात सध्या यावरून जोरदार वाद सुरू आहे. तर दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय देशात यामुळे अतिशय चुकीचा संदेस जाईल, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

हसीन पारकरला 55 लाख दिल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली. यातले सगळे पैसे अंडरवर्ल्डला गेले. असे म्हणत फडणवीसांनी मलिकांवर टेरर फंडिंगचेही आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.