कुस्तीगीरनंतर या संघटनेतील अध्यक्षपदही पवारांच्या हातून जाणार, पवारांना द्यावा लागणार राजीनामा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आलं होतं.. या संघटनेचे अध्यक्ष शरद पवार होते. त्यामुळे हा राष्ट्रवादीला एक धक्का होता. अशातच आता आणखी एका संघटनेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मात्र आता हे अध्यक्षपद त्यांना सोडावं लागणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी 11 जुलैला या संदर्भातील परिपत्रक काढलं. या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसारच आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला आपल्या घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. यामुळे यातील नियमांनुसार आता अजित पवारांना ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

काय आहे नियम –

यात एखाद्या व्यक्तीला दोन टर्म किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ संघटेनवर राहता येणार नाही, असा नियम आहे. अजित पवार हे 2013 – 2017 आणि 2017 पासून आतापर्यंत या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. हे अध्यक्षपद सोडल्यानंतर अजित पवार यांना स्पोर्ट्स कोडनुसार पुढील 5 वर्ष एमओएमध्ये रेड कार्ड असेल. त्यामुळे त्यांना पाच वर्ष सदस्य वगळता इतर पदांवर संधी नसणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.