धो धो पाऊस आणि कोसळणार्या दरडींमुळे महाराष्ट्रात गेल्या 3-4 दिवसांपासून मृत्युचे तांडव पाहावयास मिळत आहे. आता कुठे पावसाने काहीशी उसंत दिली आहे. चिखलमातीच्या ढिगार्याखाली अनेक जिती-जागती माणसे गाडली गेल्यामुळे नातलगांच्या आर्त किंकाळ्या काळीज चिरत आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगरांना बसला आहे. या 10 जिल्ह्यातील साधारणपणे 900 गावे या जलतडाख्याने उध्वस्त झाली आहेत. यापैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्र सेवा दलाच्या मदतकार्याच्या तुकड्या रवाना झाल्या असून पुनर्वसन आणि मदतीसाठी कार्यकर्त्यांनी काम सुरू केलेले आहे.
या पूरग्रस्तांना वस्तू तसेच रोख स्वरुपात मदत पोहचविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी अन्नधान्य, ब्लॅंकेट, ताडपत्री, सतरंजी, वह्या-पुस्तके, स्वेटर्स, बॅग्स सोबतच चिखलातून चालण्यास गम बूट, रोख रक्कम जे शक्य होईल ते जमा करावे.
या मदत कार्याची व्याप्ती खूप मोठी असणार आहे. आपण शक्य ते अधिक आर्थिक सहकार्य या मानवतावादी कार्याला करावे, असे आवाहन मालेगाव जिल्हा कार्याध्यक्ष विलास लांडे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंके यांनी केले आहे.
मदतीसाठी संपर्क
विलास वडगे- 94228 37507
रविराज सोनार- 9420233233
सारंग पाठक- 9860130447
राजेंद्र दिघे- 94216 00711
नचिकेत कोळपकर- 9921140729
राजीव वडगे- 98224 93259
स्वाती वाणी- 9370633060
कृपया आपली मदत वरील सेवा दल पदाधिका-यांकडे जमा करावी.