राज्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. पण या संकटात दिलासादायक बातमी म्हणजे अतिवृष्टीमुळे राज्यातील धरणं जवळपास निम्मे भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये 48.41 टक्के पाणीसाठा आहे.
आठ दिवसांपूर्वी सर्व धरणांमध्ये सरासरी 32 टक्के पाणीसाठा होता, आठवडाभरातील अतिवृष्टीमुळे 16 टक्के पाणीसाठा वाढून 48 टक्क्यांवर पोहोचलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत 9 टक्के पाणीसाठा जास्त आहे, आठवडाभरातील अतिवृष्टीमुळे राज्यातील बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटलीय.
अमरावती 46.15 टक्के
औरंगाबाद 33.73 टक्के
कोकण 58.673 टक्के
नागपूर 36. 46 टक्के
नाशिक 31.27 टक्के
पुणे 64.15 टक्के
एकूण सरासरी पाणीसाठा – 48.41 टक्के
पुण्याचं खडकवासला 100 टक्के भरण्याच्या मार्गावर
मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे शहरातील चारही धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यातच खडकवासला धरण 100 टक्के भरत आल्यामुळे मागील पहिल्यांदा खडकवासला धरणातून अडीच हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. शिवाय खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणे 50 टक्के भरली आहेत.
महाराष्ट्रातील बहुतांशी धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन धरणं आता भरण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार आहे.