देशात संसर्गजन्य आजार काही पाठ सोडायला तयार नाहीत. कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता एका नवीन आजाराने जनावरांना बाधित करायला सुरुवात केली आहे. गुजरातमधील एकूण 33 जिल्ह्यांपैकी 17 जिल्ह्यांमध्ये ‘लंपी’ त्वचारोगामुळे आतापर्यंत 1,200 हून अधिक गुरे मरण पावली आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वेक्षण, उपचार आणि लसीकरणाची गती वाढवली आहे. तसेच पशु मेळावे घेण्यावरही बंदी घातली आहे. राज्याचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी सांगितले की, या संसर्गजन्य आजारामुळे शनिवारपर्यंत 1,240 गुरांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, 5.74 लाख जनावरांना या आजारावर लसीकरण करण्यात आले आहे.
ते म्हणाले, ‘हा संसर्गजन्य आजार राज्यातील 33 पैकी 17 जिल्ह्यांमध्ये पसरला असून त्यापैकी बहुतेक सौराष्ट्र प्रदेशात आहेत.’ पटेल म्हणाले की, बाधित जिल्ह्यात कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका, राजकोट, पोरबंदर, मोरबी, जुनागढ, गीरमध्ये सोमनाथ, बनासकांठा, पाटण, सुरत, सुरेंद्रनगर, भावनगर अरवली आणि पंचमहाल यांचा समावेश आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, राज्य सरकारने 26 जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, पशु मेळ्यांवर बंदी घातली आहे, असे अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे.
राजकोट जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 21 ऑगस्टपर्यंत इतर राज्ये, जिल्हे, तालुके आणि शहरांमधून गुरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मृत गुरे उघड्यावर टाकण्यासही प्रशासनाने बंदी घातली आहे. मंत्री म्हणाले की, बाधित जिल्ह्यातील 1,746 गावांमध्ये 50,328 गुरांवर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची खरी संख्या राज्य सरकार जाहीर करत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
लंपी रोगाबद्दल जाणून घ्या
लंपी त्वचा रोग हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो डास, माशी इत्यादींच्या चाव्याव्दारे किंवा थेट संपर्काने किंवा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो. यामुळे प्राण्यांमध्ये सर्व लक्षणांसह, त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. गुरांमध्ये हा रोग झपाट्याने पसरत आहे. याला ‘लम्पी स्किन डिसीज व्हायरस’ (एलएसडीव्ही) म्हणतात. जगातील मंकीपॉक्सनंतर आता हा दुर्मिळ संसर्ग शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. यामुळे प्राण्यांमध्ये सर्व लक्षणानंतर त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. गुरांमध्ये हा रोग झपाट्याने पसरत आहे. याला ‘लंपी स्किन डिसीज व्हायरस’ (एलएसडीव्ही) म्हणतात. जगातील मंकीपॉक्सनंतर आता हा दुर्मिळ संसर्ग शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे.