उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेताच फडणवीसांची ४ शब्दांत प्रतिक्रिया
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. याआधी रविवारी (३१ जुलै) ईडीने राऊतांच्या मैत्री या बंगल्यावर छापेमारी करत कागदपत्रांची तपासणी केली. तसेच या छापेमारीदरम्यान संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. राऊतांवरील या कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच या संकटकाळात मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वास ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांना दिले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या याच भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठीक आहे. चांगले आहे, असे म्हणत या प्रकरणावर जास्त बोलण्यास टाळले आहे.
अखेर राज्यपाल नमले! कोश्यारींनी ‘त्या’ वक्तव्याबाबत मागितली माफी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला होता. राजस्थानी आणि गुजराती लोक निघून गेल्यास मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीका केली होती. तर आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने हात वर केले होते. यावर राज्यपालांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. तरीही यावर समाधान न झाल्याने काही पक्षांकडून राज्यपालांविरोधात आंदोलन सुरुच होतं. यावर आता पुन्हा एक राज्यपालांनी एका निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राऊतांना 4 आॕगस्ट पर्यंत कोठडी
पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांना विशेष ईडी न्यायालयाने 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचं आढळून येत आहे, असं मत न्यायाधिशांनी मांडलं.प्रविण राऊत पत्रा चाळीची डेव्हलपमेंट पाहत होता. त्याला HDIL कडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातले 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना परत प्रविण राऊतने 37 कोटी दिले, नंतर त्यातून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला, तसंच अलिबागची जमीनही विकत घेण्यात आली, असा गंभीर आरोप ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला.
भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी; 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
भारतात शिरकाव केलेल्या मंकीपॉक्सने आता पहिला बळी घेतला आहे. 22 वर्षांच्या तरुणाचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या केरळमध्ये देशातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला त्याच केरळात मंकीपॉक्समुळे देशातील पहिला मृत्यू झाला आहे. कोरोनानंतर आता मंकीपॉक्सची धास्ती निर्माण झाली आहे.मंकीपॉक्समुळे मृत्यू होणारा हा तरुण 22 जुलैला यूएईहून भारतात आला होता. त्यानंतर त्याच्या मंकीपॉक्ससारखी लक्षणं दिसून आली होती. 27 जुलैला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 30 जुलैला त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टाची पुन्हा नवी तारीख, सुनावणी लांबणीवर!
शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे शिवसेना कुणाची? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर 2 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण, आता ही सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे.
नोटबंदीपासून ते सिलिंडरपर्यंत.. सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या; चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला
लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने उचललेल्या विविध पावलांबाबत सवाल उपस्थित केला आहे. जीएसटीबाबत त्या म्हणाल्या की, मविआ सरकारने आधीच पत्र दिलं होतं, GST बाबत निर्णय करू नका. मात्र त्यांचं ऐकण्यात आलं नाही. नोट बंदी झाली, मी आर्थिक तज्ज्ञ नाही, पण ATM व्यवहार केल्यावर आपलेच पैसे काढायला आम्हाला पैसे द्यावे लागतात. नवं डेबिट कार्ड, बँक स्टेटमेंट, चेक बूक यासाठी चार्जेस का घेतले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आमच्याकडूनही चुका झाल्या असतील. पण काम करणाऱ्यांकडूनच चुका होतात. UPA च्या काळात सिलिंडर 300, 400 रुपये होता. पण आता 1 हजार हा जादूचा आकडा बाजारात आहे. मात्र पोट हे आकड्यांनी भरत नाही ते धान्यांने भरतं. एका अध्यक्षांनी मला, मी महिला असल्याने घरी जायला सांगितलं होतं. भर संसदेत सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. मात्र लोकसभा अध्यक्षांनी हे वक्तव्य रेकॉर्डवर न घेण्याची सूचना दिली.
गँगस्टर छोटा शकीलच्या 3 साथीदारांना मुंबई पोलिसांकडून अटक
डी कंपनी आणि छोटा शकीलच्या साथीदार असल्याचं सांगणाऱ्या आरोपींच्या घरी मुंबई गुन्हे शाखेनं छापा टाकला. यात सुरतमध्ये राहणाऱ्या आरिफ बेग मिर्झा, इलियास कपाडिया आणि अस्लम नवीवाला यांच्या घराची झडती घेतली गेली. 50 लाखांच्या खंडणीप्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहे. याच प्रकरणात ही कारवाई केली गेली. यात तिघांना अटक करण्यात आली आहे.
SD Social Media
9850 60 3590