नातेसंबंध आनंदी, निरोगी असू शकतात जोपर्यंत त्यात परस्पर विश्वास, प्रेम, एकमेकांबद्दल काळजी घेणे यासारख्या छोट्या पण महत्त्वाच्या भावनांचा समावेश होतो. जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराला आदर दिलात तर तुम्हालाही तोच आदर मिळेल. या सगळ्या गोष्टी जर एकतर्फी झाल्या तर नातं तुटायला वेळ लागणार नाही. पती-पत्नीचे नाते असो किंवा प्रियकर-प्रेयसीचे नाते असो, जोडीदाराशी कसे वागावे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. एकमेकांचे कौतुक केले की आयुष्य जगण्याची मजा वाढते. नातेसंबंधात अधिक प्रेम आणि विश्वास स्थापित केला जातो.
नातेसंबंधातील जोडीदाराचे कौतुक करणे महत्त्वाचे का आहे?
onlymyhealth.com मध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरने केलेल्या कोणत्याही कामाचे, त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करता तेव्हा ते नाते आणखी घट्ट होते. अनेकदा स्त्रिया म्हणतात की त्यांचा पार्टनर आता त्यांच्यात रस दाखवत नाही, त्यांचे ऐकत नाही. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर याचा नक्की विचार करा. कारण यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात अशी भावना निर्माण होऊ शकते की तुम्ही आता त्यांचे कौतुक करत नका, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता. नातं कमकुवत करण्यासाठी या छोट्या गोष्टी पुरेशा असतात.
कौतुक कोणाला आवडत नाही?
तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही कोणाची स्तुती करता किंवा केलेल्या कामाची प्रशंसा करता तेव्हा ती व्यक्ती आनंदी होते. जर तुम्हाला तुमचे नाते आयुष्यभर मजबूत ठेवायचे असेल तर एकमेकांचे कौतुक करा, त्यांच्या कामाचे कौतुक करा. हे वैयक्तिक स्पर्शाची भावना देते, ज्याची प्रत्येकाला नेहमीच गरज असते. यामुळे वेळोवेळी तुमच्या जोडीदाराला खास वाटून प्रेम वाढत जाते.
जोडीदाराशी नम्रपणे बोला
नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी नम्रतेने बोलणे फार महत्वाचे आहे. घरचे प्रश्न असोत की नातेवाईक एकट्याने कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या दोघांचे मत विचार सारखेच असतीलच असे नाही, पण बोलण्याने प्रश्न सुटतात. जोडीदाराच्या भावना, विचार, बाजू यांना पुन्हा पुन्हा दोष देण्याऐवजी ते समजून घ्या.
कधी कधी एकमेकांना सरप्राईज द्या
नातं जोडलं जाण्यापूर्वी जसे आपण एकमेकांना सरप्राईज देत असतो तसेच नातेसंबंध तयार झाल्यानंतरही त्याचे अनुसरण करा. छोट्या-छोट्या गोष्टी केल्याने परस्पर बंध कायम राहतात. आपल्या भावना वारंवार व्यक्त करा, हे समोरच्या व्यक्तीबद्दल कौतुक दर्शवते. हे तुम्हाला एकमेकांच्या जवळ आणते.
जोडीदाराच्या यशाचे कौतुक करा
करिअर असो, अभ्यास असो किंवा कोणत्याही क्षेत्रात तुमचा जोडीदार चांगले काम करत असेल तर त्याचे कौतुक करा. त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहित करा. तुम्ही दोघे एकाच कार्यालयात किंवा एकाच क्षेत्रात काम करत असाल आणि तुमचा जोडीदार यशाच्या शिखरावर पोहोचत असेल. तर त्याच्यावर चिडू किंवा रागावू नका, तर अभिमान बाळगा. तुम्ही त्याच्या यशाची जितकी प्रशंसा कराल तितके तुमच्या दोघांमधील बंध अधिक घट्ट होतील.