रेल्वेप्रवास हा रस्ता तसेच हवाई वाहतुकीपेक्षा सुरक्षित मानला जातो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र रेल्वेमधून प्रवास करत असाल तर काही नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घ्या रेल्वे प्रवासाचे काही नियम.
काही कारणास्तव तुमची रेल्वेगाडी निघून गेली तर घाबरू नये. तुम्ही तिकीट बुक केलेल्या स्टेशनपासून दोन स्टेशन जाईपर्यंत टीटीई तुमची जागा दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही. रेल्वेने दोन रेल्वेस्टेशन गाठल्यानंतर टीटीई तुमचे सीट अन्य प्रवाशांना देऊ शकतो.
रेल्वे प्रवास करताना तुम्हाला मिडल बर्थ मिळाले असेल तर त्याचा उपयोग तुम्ही रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंतच करु शकता. सकाळी ६ नंतर तुमच्यासोबतच दुसऱ्या काही प्रवाशांना बसता यावे म्हणून तुम्हाला मिडल बर्थ मोकळा करावा लागेल. तसा नियम आहे.
ऐनवेळी तुमच्या प्रवासात काही बदला झाला आणि तुम्हाला आणखी काही स्टेशन समोर जायचे असेल, तर तुम्ही टीटीईला सांगून तुम्हाला ज्या स्टेशनपर्यंत जायचे आहे, तेथील तिकीट टीटीईला पैसे देऊ काढू शकता.
रेल्वे प्रवासादरम्यान, रात्री दहा ते सकाळी ६ या कालावधित प्रवाशांना मोठ्या आवाजात बोलण्यास तसेच गाणे ऐकण्यास बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास रेल्वे प्रशासनाकडून तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
तिकीट खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर प्लॅटफॉर्म तिकीट काढून तुम्ही रेल्वेने प्रवास करु शकता. मात्र त्यासाठी रेल्वेत बसल्यानंतर तुम्हाला टीटीईकडून तिकीट काढणे बंधनकारक असते.
प्रवाशाला एखादा पाळीव प्राणी रेल्वेमधून घेऊन जायचे असेल, तर त्याची बुकिंग लगेज व्हॅनमध्ये करावी लागते. तसेच त्या पाळीव प्राण्याच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णत प्रवाशांवर असते.
IRCTC मान्यताप्राप्त तिकीट विक्रेता तिकिटासाठी आगावीचे पैसे घेत असेल, तर IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन तक्रार करता येते.