सोन्या पेक्षा चहा महाग प्रति किलो चक्क 99 हजार

स्पेशल चहा. त्याची किंमतही तशीच आहे. सोन्यापेक्षा हा महागडा चहा ठरला आहे. देशातील सर्वात महागड्या चहाची विक्री आसाममध्ये झाली आहे. या ‘स्पेशल टी’साठी प्रति किलो चक्क 99 हजार 999 रुपये मोजण्यात आले आहेत. ‘गोल्डन पर्ल’ असे (Golden Pearl Tea) या महागड्या चहाचे नाव आहे.

या चहाचे मालकी हक्क एएफटी टेक्नो ट्रेडकडे आहेत. ‘गोल्डन पर्ल’ हा हँडमेड चहा आहे. (Golden Pearl Handmade Tea) चहाची ही अत्यंत नाजूक व्हरायटी आहे. याचे उत्पादन दिब्रुगड विमानतळाजवळील लाहोवाल इथल्या नाहोरचुकबारी इथे घेण्यात आले आहे. चहाचा हा एक दुर्मीळ प्रकार आहे.

त्याआधी आसामची राजधानी गुवाहाटी येथेही ‘मनोहरी गोल्ड’ चहा महागडा ठरला होता. या चहाला विक्रमी बोली लागली होती. एक किलोला तब्बल 99,999 रुपये मोजण्यात आले होते. हा चहा सोन्यापेक्षा महागडा ठरला होता. तसेच गुवाहाटी येथे याआधी जगभरातल्याचा चहांच्या दर्जानुसार लिलाव झाला आहे. या दरम्यान ‘गोल्डन नीडल’ चहाच्या एका किलोला 40 हजार रुपयांचा दर मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.