नीरज चोप्रा इतिहास रचण्यासाठी सज्ज, पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये धडक

टोक्यो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. त्यानं अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेची फायनल गाठली आहे. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात आणि फक्त 12 सेकंदामध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे.

अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राच्या इव्हेंटमध्ये एकूण 34 खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. नीरज पात्रता फेरीत सर्वात प्रथम उतरला आणि त्यानं 88.39 मीटर लांब भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश केला.

फायनलमध्ये जाण्यासाठी 83.25 मीटर दूर भाला फेकणे आवश्यक होते. नीरजने त्यापेक्षा किती तरी जास्त लांब भाला फेकत गोल्ड मेडलच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. त्यानं यावर्षी स्टॉकहोममध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत 89.94 मीटर लांब भाला फेकला होता. नीरज बरोबरबच झेक गणराज्यच्या जाकूब वादलेज्चनं देखील पहिल्याच प्रयत्नात फायनल गाठली आहे.

वर्ल्ड वर्ल्ड अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत भारताला आजवर एकच मेडल मिळाले आहे. अंजू बेबी जॉर्जनं 2003 साली हे मेडल मिळवले होते. त्यानंतर 19 वर्षांनी नीरज पदकांचा दुष्काळ संपवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.