आज दि.२३ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता रात्रंदिवस फडकवता येणार राष्ट्रध्वज

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भारतीयांसाठी एक मोठी बातमी आली आहे. आता प्रत्येकजण आपल्या घरात रात्रंदिवस तिरंगा फडकवू शकतो. कारण केंद्रातील मोदी सरकारने  स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘प्रत्येक घरी तिरंगा समरोह’मधून तिरंगा फडकवण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आतापर्यंत जनतेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती.न्यूज 18 ने केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला  यांचे एक पत्र ऍक्सेस केले आहे जे त्यांनी 20 जुलै रोजी सर्व सचिवांना लिहिले होते. तिरंगा फडकवण्याचे नवे नियम त्याच दिवसापासून लागू होणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. पत्रात नवीन नियमांबाबत म्हटले आहे की, भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रध्वज कोणत्याही मोकळ्या जागेवर किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या घरात फडकवला जात असेल तर आता तो दिवसरात्र फडकवता येईल.

शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरें इतका अन्याय दुसरा कोणीच केला नाही – शरद पवार

प्रा. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात पार पडलं. कोल्हापूरचे छत्रपती शाहु महाराज कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आजवर शिव छत्रपतींवर जे लिखाण केलं गेलं त्यात काही ठिकाणी सत्याचा आधार आहे, काही ठिकाणी मात्र अतिशयोक्ती आहे. तर काही ठिकाणी धादांत खोटं सांगितलं गेलं आहे. श्रीमंत कोकाटे यांनी सत्याच्या आधारावर हे पुस्तक लिहिलं आहे.बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाणाइतका शिवछत्रपतींवर अन्याय कोणी केला नाही, असं माझं मत आहे. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला. अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं.

‘लिटिल मास्टर’चा निवृत्तीनंतरही विक्रम! साता समुद्रापार गावसकरांच्या नावाने स्टेडियम

भारतीय क्रिकेट टीमचे 73 वर्षीय महान खेळाडू सुनिल गावसकर यांच्या नावावर असंख्य रेकॉर्ड आहेत. गावसकर टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिले 10 हजार रन करणारे क्रिकेटपटू होते, याशिवाय त्यांनी बरेच विक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं नाव आणखी मोठं केलेल्या गावसकरांचा आता इंग्लंडमध्ये खास सन्मान होणार आहे. 23 जुलै म्हणजेच आज लीस्टर क्रिकेटला त्यांचं नाव देण्यात येणार आहे. इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट स्टेडियमला भारताचं नाव देण्यात येईल.लिस्टर क्रिकेटचं नाव गावसकरांच्या नावाने ठेवण्यासाठीची मोहीम भारतीय मूळ असलेले खासदार कीथ वाझ यांनी सुरू केली. कीथ वाझ यांनी बराच काळ खासदार म्हणून लीस्टरचं प्रतिनिधीत्व केलं. लीस्टर क्रिकेटचं नाव बदलून सुनिल गावसकर स्टेडियम ठेवण्याची मागणीही वाझ यांनी सगळ्यात आधी केली होती.

शिवसेनेतील फुटीमुळे सर्वसामान्य दुखावला; आदित्य ठाकरेंच्या सभेतील तो Video हृदय पिळवटून टाकेल  

शिवसेनेतील तब्बल ५० आमदार फुटणे ही महाराष्ट्राच्या राजकारणाला झटका देणारं वृत्त होतं. अनेकांना या वृत्तामुळे हादरा बसला. मात्र सर्वाधिक धक्का हा सर्वसामान्य शिवसैनिकांना बसला. अनेक वर्षांपासून आपल्या नेतृत्वासाठी अहोरात्र झटणाऱ्या या शिवसैनिकांना आपल्याच कुटुंबाचे दोन भाग होताना पाहावे लागले.

अनेकांना शेवटपर्यंत वाटत राहिलं की, गेलेले आमदार परत येतील. मात्र तसं काहीच झालं नाही. उलटपक्षी एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर आता आदित्य ठाकरे महाराष्ट्रभरात संवाद यात्रा करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांची भेट घेतली आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. गंगापूर येथील एका सभेदरम्यानच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज, त्यांचे आभार माना’, देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांची उडवली खिल्ली

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली. भाजपचा आज पनवेलमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांच्याबद्दल बोलायला लागले तेव्हा कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणाबाजीच आवाज ऐकू येतो. त्यावेळी फडणवीस कार्यकर्त्यांना संजय राऊत यांचं आभार मानण्याचा सल्ला देतात. संजय राऊत यांच्यामुळेच सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे त्यांचं आभार माना, असं फडणवीस उपरोधिकपणे बोलतात.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.