पावसाळ्यात बरेच अपघात होत असतात. अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा अपघात बाईक, कार किंवा ट्रकचा नाही तर अॅम्ब्युलन्सचा आहे. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भयंकर अपघात झाला आहे. टोलनाक्यावर ही रुग्णवाहिका धडकली आणि पेशंटसह तिघांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकात रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आहे. बिंदूर टोलनाक्यावर भरधाव रुग्णवाहिका धडकली. अपघाताचं भयकंर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येईल, धडकी भरेल.
व्हिडीओत पाहू शकता पाऊस पडतो आहे. इतक्यात तिथून एक रुग्णवाहिका सायरन वाजवत वेगाने येताना दिसते आहे. रुग्णवाहिकेत पेशंट आहे. रुग्णवाहिकेला कधीच अडवलं जात नाही. ट्राफिकमध्येही तिला जागा दिली जाते. या व्हिडीओतही रुग्णवाहिका दिसताच टोलनाक्यावरील कर्मचारी रुग्णवाहिकेच्या मार्गात येणारे अडथळे दूर करताना दिसतात.
कर्मचारी रस्त्यावरील बॅरिकेट्स हटवायला जातात. जशी अॅम्ब्युलन्स टोलनाक्याजवळ येते तसं त्यावरील नियंत्रण सुटतं आणि ती रस्त्यावरून स्लीप होताना दिसते. ती धडकते थेट टोलनाक्यालावरील टोल बूथ केबिनला.
अॅम्ब्युलन्सचा अपघात किती भयंकर आहे हे तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. अॕम्ब्लुन्स गोल फिरून टोलनाक्याला धडकली आणि त्याचा मागील दरवाजा उघडून त्यातील रुग्णासह कर्मचारीही बाहेर पडले.
रिपोर्टनुसार ही अॕम्ब्युलन्स एका रुग्णाला कुंडापुराहून होन्नावराला घेऊन जात होती. उडुपीतल्या बिंदूरमधील शिरूरू गावातील हायेववर हा अपघात झाला. या अपघात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात रुग्णाचाही समावेश आहे.