राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा आज निकाल, द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित

भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती म्हणून विजय निश्चित मानला जातो आहे. त्यामुळे त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या नेत्या असेल. मात्र, याच द्रौपदी मुर्मू यांचा ४२ वर्षांपूर्वी श्याम चरण मुर्मू यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. द्रौपदी मुर्मू यांचे लग्नापूर्वीचे नाव द्रौपती टुडू असे होते. लग्नानंतर त्या द्रौपती मुर्मू झाल्या आणि ४२ वर्षांपूर्वी पहाडपूर हे गाव द्रौपती टुडू यांचे सासर बनले.

भुवनेश्वरमध्ये झाली दोघांची भेट

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, द्रौपदी मुर्मू यांचे भुवनेश्वरमध्ये पदवीचे शिक्षण सुरू होते. १९६९ ते १९७३ दरम्यान आदिवासी निवासी शाळेत शिक्षण घेतलेल्या मुर्मू यांनी नंतर पदवीसाठी भुवनेश्वरच्या रमा देवी महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच दरम्यान त्यांची भेट शाम चरण मुर्मू यांच्याशी झाली. शाम चरण हे देखील याच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. काही दिवसांतच दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

१९८० मध्ये झाला प्रेमविवाह

दरम्यान, शाम चरण हे १९८० मध्ये लग्नाचा प्रस्ताव घेऊन द्रौपती मुर्मू यांच्या गावी गेले. यावेळी त्यांनी सोबत काही नातेवाईकांनाही नेले होते. त्यांनी तीन दिवस वरवाडा गावात आपला तळ ठोकला होता. मात्र, द्रौपती मुर्मू यांचे वडिल बिरंची नारायण टुडू यांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. अखेर नातेवाईकांनी समजवल्यानंतर त्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला.

घरातच सुरू केली शाळा

पहाडपूर गावाच्या मध्यभागी एक एक छोटी इमारत आहे. या इमारती श्याम लक्ष्मण शिपून उच्च प्राथमिक शाळा भरते. ही इमारत पूर्वी द्रौपदी मुर्मू यांचे घर होते. मात्र, मुलं आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी या इमारतीचे शाळेत रुपांतर केले. द्रौपदी मुर्मू या मुलांच्या आणि पतीच्या पुण्यतिथीला येथे नक्की येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.