रोटरी क्लब जळगाव सेंट्रलतर्फे वृक्षारोपण अभियानांतर्गत पानशेवडी पाड्यावर फळ झाडांची लागवड करण्यात आली. भविष्यात या उपक्रमाचा निश्चित उपयोग होऊ शकतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला.
सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चोपडा तालुक्यातील पानशेवडी या पाड्यावर आंबा, चिकू,आवळा, फणस ,अंजीर , लिंबू ,पेरु या सारख्या फळझाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष विपुल पारेख , पर्यावरण कमिटी चेअरमन दिलीप लुणीया , प्रकल्प समन्वयक डाॕ.विद्या चौधरी , सौ.साधना दामले , डाॕ.प्रिती पाटील , प्रभू पटेल , दिनेश थोरात , देवगिरी कल्याण आश्रमचे प्रांत संघटन मंत्री विठ्ठल मॕकलवाड यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.पुढच्या वर्षी १०० फळझाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात येण्याचे आयोजकांनी सांगितले.डाॕ.विद्या चौधरी यांनी उपस्थित महिलांना आपल्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.तसेच दर महिन्याला या पाड्यावर येऊन महिला, मुलांसाठी वैद्यकीय शिबीर घेण्याचा मानस ही व्यक्त केला.पाड्यावरील आदिवासी बांधवांनी या रोपांची जपवणूक करण्याची भावना व्यक्त केली.यावेळी मोठ्या प्रमाणावर पाड्यावरील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.