भाजी विक्रेत्याची मुलगी बनली न्यायाधीश

कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत, समस्या आणि गरिबी काही अडथळे निर्माण करू शकतात, परंतु प्रयत्न सुरु ठेवला तर यश मिळतंच. दिवाणी न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या इंदूरमधील भाजी विक्रेत्याची मुलगी अंकिता नागर हिच्यासोबतही असेच काहीसे घडले.

इंदूरच्या मुसाखेडी येथील सीताराम पार्क कॉलनीत अंकिता नागर राहते. तिचे वडील अशोक नगर येथे भाजीविक्री करतात, तर आई लक्ष्मी इतरांच्या घरी जेवण बनवते. संघर्षाच्या काळातून जात असलेल्या या कुटुंबातील मुलगी अंकितासाठी न्यायाधीश बनणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते, पण आपण न्यायाधीश होणारच असा निर्धार तिने केला होता.

अंकिताने वैष्णव कॉलेज, इंदूरमधून एलएलबी केले आणि तिने 2021 मध्ये एलएलएम परीक्षा उत्तीर्ण केली, वडिलांनी कर्ज घेतले आणि कॉलेजची फी जमा केली आणि तिने दिवाणी न्यायाधीश होण्याची तयारी सुरू केली. दोन वेळा तिने परीक्षा दिली पण यश मिळू शकले नाही, त्यानंतरही पालकांनी तिला पुढील तयारीसाठी प्रोत्साहन दिले.

अंकिता ज्या घरात राहते त्या घराच्या खोल्या खूप लहान आहेत आणि उन्हाळ्याच्या हंगामात ती अशी बनते की, उष्णतेमुळे घरात राहिल्यावर घामाच्या धारा थांबत नाहीत. पावसाचे पाणी तिच्या घरात नेहमीच शिरायचे. अंकिताला एक भाऊ असून त्याने मजुरी करून पैसे गोळा केले आणि तिच्यासाठी एक कूलर आणला. ज्यामुळे तिला अभ्यास करणे सोपे झाले.

अंकिताचे वडील अशोक नागर सांगतात की, त्यांची मुलगी खूप दिवसांपासून संघर्ष करत होती, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, अशा परिस्थितीत अंकिताच्या अभ्यासासाठी अनेकदा पैसे उसने घ्यावे लागले पण तिचा अभ्यास थांबू दिला नाही, शेवटी तिला यश मिळाले.

अंकिताने प्रसारमाध्यमांना सांगितले की, ती रोज ८ तास अभ्यास करायची आणि संध्याकाळी गाडीवर गर्दी जास्त झाली की ती तिच्या वडिलांच्या मदतीसाठी पोहोचायची. कधी कधी ती रात्री दहा वाजता घरी परतायची आणि त्यानंतर अभ्यास करायची. गेल्या तीन वर्षांपासून दिवाणी न्यायाधीशपदाची तयारी करत होते. तिचा असा विश्वास आहे की परीक्षेत नंबर कमी-जास्त येत राहतात, परंतु विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, जर ते नापास झाले तर त्यांनी पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.