गडचिरोलीत पुराचा हाहाकार, अनेकांच्या घरात पाणी, एकजण वाहून गेला तर गावांचा संपर्क तुटला
मागच्या दोन दिवसांपासून विदर्भात जोरदार पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथे रात्री अनेक जणांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने तातडीने त्यांना घराबाहेर पडावे लागले. नागपेल्ली येथे आपत्ती निवारण दल आणि पोलिसांनी १ महिन्याच्या बाळासह सुमारे ७० जणांना सुरक्षितरित्या स्थलांतरीत केले आहे.
भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
शिवसेनेच्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना मतदान देण्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्वत: जाहीर केलं. आदिवासी महिलेला राष्ट्रपदी होण्याची संधी मिळणार असल्याचं त्यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काल शिवसेना खासदारांच्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान देण्यावरुन गदारोळ उठला होता. त्यावेळी सेनेच्या खासदारांना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती ठाकरेंकडे केल्याची चर्चा होती. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज आपला निर्णय जाहीर केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या एका शब्दाने परिस्थिती बदलली; बंडखोर संतोष बांगर यांना जबर हादरा!
आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शिंदे यांनी बांगर हे जिल्हाध्यक्षपदी कायम राहणार अशी घोषणा करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशालाच चॅलेंज केलं आहे.दरम्यान उद्धव ठाकरेंनीही आपली खेळी खेळली आहे. आणि परिणामी बांगर यांना जबर हादरा बसला आहे. संतोष बांगर यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचं मन वळवण्यात उद्धव ठाकरे यांना यश मिळालं आहे. जिल्ह्यातील सहापैकी पाच तालुकाप्रमुख आणि सर्व जिल्हाप्रमुख, शिवाय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी नगरसेवक यांनी ठाकरेंना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना राज्यपालांविरोधात आक्रमक! राऊत म्हणाले, कोश्यारींनी आता इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये
शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यात भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. याचवेळी संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूमिकेवर आक्रमकपणे टीका केली आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना स्थापन झालेलं हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचे 50 हजार मिळणार, मुख्यमंत्र्यांचा आदेश
नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. दरम्यान याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी हे उद्या (दि.13) रोजी शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
स्थानिक निवडणुका आरक्षणाविनाच, सरकारला धक्का
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे.राज्यात जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टाने या निवडणुकीमध्ये कोणतेही बदल करण्यास नकार दिला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी ही 19 जुलैला होणार आहे.ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. काही दिवसांपूर्वी बांठिया आयोगानं राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा सादर केलाय आहे. इम्पिरिकल डेटाबाबतच हा डेटा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. राज्य सरकारच्या वतीने कोर्टामध्ये जो इम्पेरिकल डाटा सादर करण्यात आलेला आहे. त्याच्या आधारावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करावे अशी मागणी करण्यात आली.
२४ वर्षापूर्वीच्या ‘त्या’ गुन्ह्यासाठी माफ करणार नाही; गँगस्टर बिश्नोईची सलमान खानला धमकी
गेल्या महिन्यात अभिनेता सलमान खानला गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा लॉरेन्स बिश्नोई सलमान खानला धमकी दिली आहे. २४ वर्ष जून्या काळवीट हत्या प्रकरणी बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली आहे. जोपर्यंत सलमान काळवीट हत्या प्रकरणी सार्वजनिक माफी मागत नाही तोपर्यंत सलमानला माफ करणार नाही असं, बिश्नोई म्हणाला असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
भारताचा गोलंदाजीचा निर्णय, इंग्लंडविरोधात विराटविना टीम रोहित मैदानात
इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि इंग्लंडमध्ये आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. तीन टी-20 सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली होती. आता एकदिवसीय मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला आहे. भारताने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना होत आहे. दुखापतीमुळे विराट कोहली पहिला सामना खेळत नाही आहे. विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याचवेळी शिखर धवन रोहित शर्मासोबत फलंदाजी करताना दिसणार आहे.
SD Social Media
9850 60 3590