सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अमरनाथ येथे ढगफुटीचं प्रकरण ताजं आहे. हिमाचल प्रदेशातही पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना होत असतात. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये पर्यटकांच्या गाड्यावर दरड कोसळल्याचं दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशमधील एक स्पॉटवर पंजाबमधील पर्यटकांच्या गाड्या उभ्या होत्या. त्यावेळी डोंगराचा एक मोठा भाग या गाड्यांवर कोसळला. यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणी पर्यटक बसले नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
या घटनेनंतर वाहन चालकांमध्येही भीती पसरली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत घरी सुरक्षित राहणं योग्य आहे.