एका वर्षात काय बदललं? रवी शास्त्रींनी ठेवलं टीम इंडियाच्या दुखऱ्या जागेवर बोट!

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडने 378 रनचं आव्हानही अगदी सहज पार केलं, यानंतर टीम इंडियाच्या बॉलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली होती, पण पाचव्या सामन्याआधी टीममध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आणि टेस्ट पुढे ढकलण्यात आली. हीच टेस्ट यावर्षी खेळवली गेली. मागच्यावर्षीपर्यंत फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला अचानक काय झालं? असा प्रश्न उपस्थित झाला. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मुख्य म्हणजे रवी शास्त्री मागच्या वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते.

चौथ्या इनिंगमध्ये कर्णधार जसप्रीत बुमराहच्या lनेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय बॉलर्सची कामगिरी सुमार झाली, पण रवी शास्त्री यांनी भारताच्या पराभवाला बॅट्समनना जबाबदार धरलं आहे. एजबॅस्टन टेस्टच्या चौथ्या दिवशी भारतीय बॅट्समननी खराब बॅटिंग केल्याचं शास्त्री म्हणाले. भारतीय खेळाडूंच्या बॉडी लँग्वेजला नेमकं काय झालं? खेळपट्टीसारखीच त्यांची बॉडी लँग्वेजही सपाट झाल्याची प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.

एजबॅस्टनमध्ये भारतीय बॅट्समनची कामगिरी निराशाजनक झाली. बॅट्समनकडे इंग्लंडला मॅचच्या बाहेर करण्याची संधी होती, त्यांना फक्त दोन सेशन बॅटिंग करण्याची गरज होती, पण टीमा डिफेन्सिव अप्रोच महागात पडला. विकेट गेल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी धोका पत्करण्याची गरज होती, पण यात त्यांना अपयश आलं, असं शास्त्री म्हणाले.

भारतीय बॅट्समननी चौथ्या दिवशी सातत्याने विकेट गमावल्या, त्यामुळे इंग्लंडला बॅटिंग करण्यासाठी चांगला वेळ मिळाला. भारतीय खेळाडूंची हीच चूक झाल्याचं रवी शास्त्री यांनी सांगितलं. भारताला इंग्लंडमध्ये सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक संधी चालून आली होती, पण या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही. भारताने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज 2007 साली जिंकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.