‘आमच्यासोबत 115 आमदार, पण…’, मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीसांचं मोठं विधान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबतचा निर्णय हा आपल्या प्रस्तावानंतर घेतला गेल्याची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतचा प्रस्ताव मी नेला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, असा प्रस्ताव मी दिला होता. तो प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठांनी मान्य केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमच्यासोबत 115 आमदार होते. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण आमच्या पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असंदेखील फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातल्या या सत्तानाट्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अमित शाह यांचं नाव घेतलं आहे. ‘मी सरकारच्या बाहेर राहीन, असं ठरलं होतं, पण सरकारमध्ये राहून काम करणं योग्य राहील, बाहेरून असंविधानिकपणे सरकार चालवणं योग्य नाही, असं आमच्या वरिष्ठांनी मला सांगितलं, त्यामुळे मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, यात मला कुठेच अपमान वाटत नाही,’ असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण प्रवासात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून सोबत होते, असं सांगत फडणवीस यांनी अमित शाह यांचे आभार मानले.
“चलो मोदी आवास”; परीक्षा पुढे ढकलण्यासाठी NEET उमेदवारांचं नवं शस्त्र
नॅशनल एलिजिबिलिटी आणि एंट्रन्स परीक्षा 2022 शी संबंधित हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने JEE Mains 2022 पुढे ढकलल्यापासून NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. ट्विटरवरकाही हॅशटॅग्स ट्रेंड करत आहे. NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळणार आहे म्हणून NEET 2022 पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सुरु आहे. इतकंच नाही तर ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी आता उमेदवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी चला अशा प्रकारचे ट्विटर हॅशटॅग्स चालवायला सुरुवात केली आहे.
सीएनजी भरल्यावर निघाली स्कूल व्हॅन अन् धावताना लगेचच घेतला पेट
सीएनजी किट असलेल्या कारने रस्त्यावर धावताना पेट घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक घटना पनवेलमधून समोर आली आहे. गाडीमध्ये सीएनजी गॅस भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर निघाल्यावर काही अंतर पुढे गेलेल्या स्कूल व्हॅनने अचानकपणे पेट घेतला. ही घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच धावपळ उडाली.
घरासमोर खेळणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीवर बिबट्याने मारली झडप, जंगलात नेऊन केले ठार
नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याने एका आठ वर्षांच्या मुलीवर हल्ला केला आणि जंगलात नेऊन तिला ठार मारलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या धुमोडी गावात ही घटना घडली. सोमवारी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास बिबट्याने एका ८ वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. रुची एकनाथ वाघ (वय ८) असं या मुलीचे नाव आहे. बिबट्याने जबड्यात धरून या मुलीला जंगलात नेले. सुमारे साडे चार तास वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी रात्री शोधकार्य केलं. अखेरीस अकरा वाजेच्या सुमारास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात बलिकेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला.
बुलढाण्यात धक्कादायक प्रकार, आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा सपाटा
बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटचे टोक असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत आदिवासी बहुल भागातील आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा काही भूमाफियांनी सपाटा लावला आहे. तब्बल दीडशे एकर जमीन या भूमाफियांकडून हडपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात चिचारी गाव परिसरात आदिवासी बांधवांच्या जमिनी आहेत. मात्र येथील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संगनमत करून काही गैर आदिवासींच्या घशात हे भूखंड घातल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज18 लोकमतच्या हाती लागलाय.
मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘होममिनिस्टर’चा फुल टू जल्लोष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय संघर्ष करत सरकार आणून दाखवले आहे. मागील १५ दिवसांच्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री शिंदे सोमवारी घरी पोहोचले. त्यावेळी शिंदे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि कुटुंबीयांनी स्वागत केलं. विशेष म्हणजे, यावेळी लता शिंदे यांचा ड्रम वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक दिवसांनी आपल्या स्वगृही परतले. यावेळी शिंदे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. मागील १५ दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कुटुंबापासून दूर होते, त्यामुळे यावेळी कुटुंबीय भावुक झाले होते.
प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या, शिष्याच्या वेशात आलेल्या दोघांनी केले 70 हून अधिक वार
कर्नाटक राज्यातील हुबळीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी शिष्याच्या वेशात आलेल्या राक्षसी प्रवृत्तीच्या दोघांनी प्रसिद्ध ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्या चाकूने वार करत त्यांची हत्या केली. हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पाहुण्यांना भेटण्यासाठी ज्योतिषाचार्य हॉटेलच्या लॉबीमध्ये आले होते. याच वेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत आपला डाव साधला.
दिल्लीहून दुबईला निघालेल्या Spicejet च्या फ्लाईटचं पाकिस्तानात लँडिंग
दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या SG-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कराची (पाकिस्तान) येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या प्रकरणावर एक निवेदन जारी करताना स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, स्पाइसजेट B737 विमान ऑपरेटिंग फ्लाइट SG-11 (दिल्ली-दुबई) इंडिकेटर लाईटच्या खराबीमुळे कराचीला वळवण्यात आली.विमान कराचीत सुखरूप उतरलं आणि प्रवाशांना सुखरूप लँड करण्यात आलं आहे. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, कोणतीही आपात्कालीन स्थिती ओढावली नाही आणि विमानाने सामान्य लँडिंग केलं. याआधी या विमानात काहीही बिघाड झाल्याचं वृत्त नव्हतं.
मंत्र्याची थेट संविधानावर बेधुंद टीका; म्हणे, ‘घटनेनंच कामगारांच्या लुटीचा मार्ग मोकळा केला…’
केरळचे सांस्कृतिक मंत्री साजी चेरियान यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मागच्या 75 वर्षांत कामगार वर्गाला लुटण्यास मदत केल्याचे सांगून त्यांनी भारतीय संविधानावर टीका केली.ते म्हणाले की, आम्ही आंधळेपणाने ब्रिटीश व्यवस्थेची नक्कल करून राज्यघटना लिहिली. मात्र, संविधान शोषणाविरुद्ध कधीही संरक्षण देत नाही. संविधानामुळे सामान्य माणसाला आणि कामगार वर्गाला लुटण्यास मदत होते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
देव-देवतांचे फोटो असलेल्या पेपरमध्ये गुंडाळून चिकन विक्री; चौकशीसाठी पोलीस गेले, तर त्यांच्यावरच केला हल्ला
उत्तरप्रदेशच्या संभलनगरमधून एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी देवी-देवतांची चित्रे असलेल्या वर्तमानपत्रात चिकन विकण्यापासून रोखायला गेलेल्या पोलीस पथकावरच चाकूने हल्ला करण्यात आला.याप्रकरणी पोलिसांवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी संभलनगरमध्ये एका हॉटेल चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव तालिब हुसैन असे आहे.
SD Social Media
9850 60 3590