देशात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पात्रता परीक्षा म्हणून घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी विद्यार्थ्यांच्या मागणीवर काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं आहे.
नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार आहे. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. एमपीएससी, दहावी, बारावी, तसंच सीबीएसई बोर्डानं परीक्षा रद केल्या आहेत. नेटची परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. UGC NET 2021 परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं मे महिन्यातील 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 तारखेला आयोजित केली जाणार आहे. तसेच डिसेंबर 2020 महिन्यातील यूजीसी नेटची परीक्षा कोरोनामुळे लांबली होती. ती आता 2021 च्या मे महिन्यात घेतली जाईल.