अविनाश भोसले आता ईडीच्या ताब्यात, आता काँग्रेस-राष्ट्रवादी रडारवर?

DHFL प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणामध्ये ईडीचीही एंट्री झाली आहे.  ईडीने अविनाश भोसले यांची कस्टडी घेतली आहे. अविनाश भोसले यांचा संबंध राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत येत असल्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज्यात एकीकडे सत्ता संघर्ष सुरू असताना आता ईडीने एंट्री केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसीनंतर ईडीने आपला मोर्चा अविनाश भोसले यांच्याकडे वळवला. ईडीने अविनाश भोसले यांची कस्टडी घेतली आहे. मागील महिन्यातच अविनाश भोसले यांना ईडीने अटक केली होती. आता याच प्रकरणात ईडी सुद्धा चौकशी करणार आहे.

अविनाश भोसले हे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात आहे, त्याचबरोबर काँग्रेस नेते विश्वाजित कदम यांचे सासरे आहेत. याशिवाय अविनाश भोसले हे शरद पवार यांच्या जवळच्या लोकांपैकी असल्याचं सांगितलं जात आहे. या वृत्तामुळे पवारांना मोठा झटका बसू शकतो.

गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली.

अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.