महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 30 ते 35 आमदारांसह बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. विशेष म्हणजे सोमवारी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीनंतर लगेच शिवसेनेत फूट पडली. पण शिवसेनेत एवढी मोठी बंडखोरी होणार असल्याचं पूर्वनियोजित होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वी चार दिवस आधीच सुरतचा प्लॅन ठरलेला होता.
ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरत आणि अहमदाबादमध्ये चार दिवसांपूर्वीच 6 हॉटेल्समध्ये बुकींग करुन ठेवण्यात आलं होतं. ठाण्यातीलच एका मोठ्या नेत्याने ती बुकिंग केली होती. विशेष म्हणजे हा नेता एकनेता शिंदे आणि बंडखोर 34 आमदारांच्या सतत संपर्कात होता. काही नेते चार दिवसांआधीच गुजरातला जावून ठाण मांडून होते. ते सुरतच्या ली मॅरेडिन हॉटेलमध्येच होते. ते भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात मध्यस्थीचे काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.