कृषी मंत्री दादा भुसे हे रात्री उशिरा सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी सातारा शहरालगत असणाऱ्या वाढे गावात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी खरीप हंगामाबाबत माहिती घेऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी बाबत घाई न करता पावसाचा अंदाज घेऊन 70 ते 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे आवाहन या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी केले आहे.
कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या कृषी आढावा बैठकीत सातारा कृषी विभागाने बनावट बियाने बाबत केलेल्या कारवाईचे कौतुक करत. ते म्हणाले महाराष्ट्रातील बनावट बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांना इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बनावट बियाण्यांचा प्रकार निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचे बैठकीत त्यांनी सांगितले आहे.
कृषी आढावा बैठकीनंतर शेतकरी संवाद बैठक पार पडली यावेळी शेतकऱ्यांना उद्भवत असलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी उत्तरे दिली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सातारा तालुक्यातून शेतकरी वर्ग उपस्थित होता.
कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून ही सूचना
राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले.