sdnewsonline मध्ये आपण सर्वांचे स्वागत
नमस्कार
अजून दोन ते तीन दिवस
रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार
राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रूग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढवण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्यात अजून दोन ते तीन दिवस रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार असल्याची माहिती दिली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शंभर टन
ऑक्सिजनचा पुरवठा करणार
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन तेल शुद्धीकरण कंपन्यांतून महाराष्ट्रासह इतर राज्यात ट्रकद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. उद्योगांसाठी लागणार्या या ऑक्सिजनमध्ये थोडा बदल करून त्याचा वापर वैद्यकीय सेवेसाठी होऊ शकणार आहे. कोविडमुळे आजारी असलेल्या गरजू रुग्णांना हा ऑक्सिजन दिला जाणार आहे. जामनगरच्या तेल शुद्धीकरण कंपन्यांतून शंभर टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थिती रुग्णांची गरज ओळखून माणुसकीचे दर्शन घडवत कंपनीने मोफत ऑक्सिजनपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान मध्ये सोशल
मीडियावर तात्पुरती बंदी
पाकिस्तानात सुरु असलेल्या अंतर्गत हिंसाचारामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. पाकिस्तानातील इमरान सरकारने कट्टरपंथी संघटनेसमोर अक्षरश: गुडघे टेकल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरील वेगाने पसरत असलेल्या व्हिडिओत पोलीस हिंसक जमावासमोर हतबल झाल्याचं दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने इमरान सरकारने सोशल मीडियावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत देशात ट्विटर, फेसबूक, यूट्यूब, व्हॉट्सअँप आणि टेलिग्राम सेवा सकाळी ११ ते ३ यावेळेत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकाश जावडेकर यांना
कोरोनाचा संसर्ग
देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वेगाने पसरत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. दरम्यान आज केंद्रीयमंत्री व भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
विषाणूच्या नव्या प्रकाराचे
महाराष्ट्रात ६० टक्के रुग्ण
विषाणूने भारतातच तीन रूप बदलले आहेत. एका परिसरात तीन प्रकारचे विषाणू आणि इतर राज्यात दोन प्रकारच्या विषाणूमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जिनोम सिक्वेंसिंगची माहिती सार्वजनिक करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १० राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात ६० टक्के रुग्ण विषाणूच्या नव्या प्रकाराचे असल्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, ब्रिटिश (बी. १.१.७), दक्षिण अफ्रिकी (बी. १.३५१) आणि ब्राझील (पी. १) वरून आलेले आहेत.
१०० नव्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन
प्लँट उभारण्याची योजना
भारतात कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पीएम केअर्स फंडमधून १०० नव्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँट उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ५० हजार मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णयही घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये ऑक्सिजनची मागणी आहे.
पवित्र अमरनाथ यात्रेच्या
नाव नोंदणीला प्रारंभ
जम्मू काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेच्या नाव नोंदणीला प्रारंभ झाला आहे. एकंदर ५६ दिवसांची ही यात्रा २८ जून ते २२ ऑगस्ट कालावधीत होणार आहे. पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गे ही यात्रा होणार आहे. जम्मू – काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक आणि येस बँकेच्या शाखांमधून यासाठी नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती श्री अमरनाथजी पवित्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वरकुमार यांनी दिली आहे. यात्रा नोंदणीसाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
तीन नेत्यांना
कोरोनाची बाधा
कोरोना प्रादुर्भावापासून राजकीय नेतेही बचावलेले नाहीत. दररोज कुठल्या ना कुठल्या नेत्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आज सकाळीच तीन नेत्यांनी कोरोना बाधेची माहिती सोशल मिडियात पोस्ट करुन दिली आहे. त्यात काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, अकाली दलाच्या नेत्या व माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि काँग्रेस नेते व प्रवक्ते रणदीप सिंग सूरजेवाला यांचा समावेश आहे.
एकट्यात असाल
तरीही मास्क अनिवार्य
दिल्ली आणि महाराष्ट्रात दररोज हजारो रुग्ण आढळत आहेत. जगभरातील तज्ज्ञांनी मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हे दोनच उपाय असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तर हे दोन नियम न पाळणे दुसऱ्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे, असे म्हटले होते. सध्या तेच सुरू आहे. तुम्ही एकट्यात असाल तरीही मास्क अनिवार्य आहे, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. चालान कापण्याच्या निर्णायाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. दिल्ली सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींचे राज ठाकरे
यांनी मानले आभार
विविध कारणांवरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लक्ष्य करीत असतात. मात्र, आज त्यांनी मोदी आणि केंद्राचे आभार मानले आहेत. त्याचे कारण म्हणजे, केंद्र सरकारने मुंबईतील हाफकीन्स या संस्थेले कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन या लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. देशातील लसीकरणात ही बाब महत्त्वाची असल्याचे राज यांनी म्हटले आहे.
कोरोना बाधित महिलेच्या
शरीरात फुफ्फुस प्रत्यारोपण
कोरोना बाधित महिलेच्या शरीरात फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात जपानी शल्यचिकित्सकांना मोठे यश मिळाले आहे. यापुर्वी मृत व्यक्तिच्या शरीरातील फुफ्फुस काढून जिवंत व्यक्तिच्या शरीरामध्ये प्रत्यारोपणाची अनेक यशस्वी ऑपरेशन्स जगभरात करण्यात आली आहेत, परंतु सजीव व्यक्तिच्या फुफ्फुसातील काही भाग काढून प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. क्योटो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने सांगितले की, 11 तासांच्या प्रयत्नानंतर 30 डॉक्टरांची टीम त्यात यशस्वी झाली.
इन्फोसिस आणि TCS मध्ये
मेगा भरतीची योजना
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मध्ये 40 हजार पदांसाठी भरती सुरु होणार आहे. गेल्यावर्षीही कंपनीने एवढ्याच लोकांची भरती केली होती. भारताची दुसर्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 2021-22 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून 26000 फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एट्रिशन रेट 15 टक्के होता (attrition/कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचा दर). जुलै 2021 पासून कंपनीने सेकंड परफॉर्मेन्स रिव्ह्यूला सुरुवात करणार आहे.
उपनगरीय रेल्वे स्टेशनवर
मजुरांची तोबा गर्दी
सध्या राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. दुसरीकडे ही संचार बंदी अधिक कडक करण्याचे नियोजन सुरू असल्याने रोजगारावर परिणाम होण्याची भीती लक्षात घेऊन मजुरांनी आपापल्या गावी जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईतील उपनगरीय स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात मजुरांची गर्दी झाली आहे. कुर्ल्यापासून ते नालासोपाऱ्यापर्यंतच्या जंक्शनवर कुटुंबकबिल्यासह मजुरांनी धाव घेतल्याने या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच स्टेशनमध्ये कुणालाही सर्रासपणे जाऊ देण्यात येत असल्याने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
राज्यात निर्बंध अधिक कडक
होणार : विजय वडेट्टीवार
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मुंबईतील लोकलमध्येही लोकांची वर्दळ पाहायला मिळाली.
भारताकडे 657 टन
सोन्याचे भंडार
सोने खरेदी करणे हा सर्वांचा आवडता विषय आहे. केसांमध्ये आता हॉल मार्क असलेले सोन्याचे दागिने विकणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जगात देशांमध्ये भारताचा क्रंमाक वरचा आहे, परंतु जगाच्या तुलनेत भारताकडे 657 टन सोन्याचे भंडार आहे. जागतिक सोन्याच्या भंडाराच्या बाबतीत भारताचा नववा क्रमांक लागतो.
सीबीआयचे रणजीत सिन्हा
यांचे कोरोनामुळे निधन
सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रणजीत सिन्हा बिहार कॅडरचे १९७४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१२ ते २०१४ दरम्यान ते सीबीआयच्या संचालकपदी होते.
SD social media
9850 60 3590