यंग सिटिझन्स टेरिटोरियल आर्मी ऑफिसर्स पदासाठी लवकरच भरती

यंग सिटिझन्स टेरिटोरियल आर्मी ऑफिसर्स पदासाठी लवकरच भरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. टेरिटरी आर्मी लवकरच याबाबत अधिसूचना जारी करेल आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करेल. jointerritorialarmy.gov.in वर सुरू करेल अशी अपेक्षा आहे. टेरिटरी आर्मीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. सप्टेंबर 2022 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. अपडेटसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला गेला आहे. येथे तुम्ही पात्रता, निवड प्रक्रिया, मानक आणि अभ्यासक्रम तपासू शकता. या भरती प्रक्रियेद्वारे पुरुष उमेदवारांची 12 पदे आणि महिला उमेदवाराचं एक पद भरायचं आहे. मात्र, ही पदे गरजेनुसार वाढवता किंवा कमी करता येतात.

पगाराबद्दल बोलायचे झाले तर लेफ्टनंट पदासाठी 56,100 – 1,77,500 रुपये पगार मिळेल. कॅप्टन पदासाठी 61,300 – 1,93,900 रुपये प्रति महिना मिळतील. मेजर पदासाठी 69,400 – 2,07,200 प्रति महिना पगार मिळेल. लेफ्टनंट कर्नल पदासाठी 1,21,200 ते 2,12,400 रुपये प्रति महिना वेतन मिळेल. कर्नल पदासाठी 1,30,600 – 2,15,900 प्रति महिना पगार उपलब्ध असेल. ब्रिगेडियरच्या पदासाठी, 1,39,600 रुपये – 2,17,600 रुपये प्रति महिना दिले जातील.

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे. आणि एकूण गुण 50 टक्के असावेत.

अर्ज असा करावा

अर्ज करण्यासाठी प्रथम joinerritorialarmy.gov.in वर जा.
तुम्हाला वेबसाइटच्या होमपेजवर अर्ज करण्याची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
आता तेथे मागितलेले आवश्यक तपशील भरावे लागतील.
परीक्षा केंद्रासाठी निवड काळजीपूर्वक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.