राज्यासाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाने जून महिन्यात आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. तसेच मुंबईतील रुग्णसंख्येत असलेली वाढ कायम आहे. मृतांचा आकडा वाढला आहे. चिंता वाढवणारी बातमी म्हणजे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या 2 नव्या रुग्णांचं निदान झालं आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 956 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना रुग्णांचा जून महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. तर मुंबईत 1 हजार 724 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण
राज्य सरकारची चिंता वाढवणारी आणखी एक बाब म्हणजे, राज्यात आज आणखी नवा व्हेरिएंट बीए.5 चे (B A.5) 2 रुग्ण आढळले आहेत. हे 2 जण ठाण्यातील आहेत.
राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी
सोमवार 13 जून : 1 हजार 885
रविवार 12 जून : 2 हजार 946
शनिवार 11 जून : 2 हजार 922
शुक्रवार 10 जून : 3 हजार 81
गुरुवार 9 जून : 2 हजार 813
बुधवार 8 जून : 2 हजार 701
मंगळवार 7 जून : 1 हजार 881
सोमवार 6 जून : 1 हजार 36
रविवार 5 जून : 1 हजार 494
शनिवार 4 जून : 1 हजार 357
शुक्रवार 3 जून : 1 हजार 134
गुरुवार 2 जून : 1 हजार 45
बुधवार 1 जून : 1 हजार 81