भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कटकमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांची कहाणी दुसऱ्या सामन्यातही बदलू शकली नाही. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कसोटीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 पर्यंत भारतीय संघाचा आकडा आणखी खालावत गेला आणि सातव्या प्रयत्नातही संघ अपयशी ठरला.
रविवारी 12 जून रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताचा 4 गडी राखून पराभव केलाय. आफ्रिकेने यासह 2-0 ने आघाडी घेतली आहे. ज्यामुळे टीम इंडियावरचा दबाव आणखी वाढला आहे. वेगवान गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीनंतर हेनरिक क्लासेसने 81 धावांची खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.
पहिल्या सामन्याप्रमाणेच भारतीय गोलंदाज दुसऱ्या सामन्यात ही फ्लॉप ठरले. भुवनेश्वर कुमार वगळता संघासाठी कोणीही चांगली गोलंदाजी केली नाही. भुवनेश्वर कुमारने चमकदार कामगिरी करत चार विकेट घेतले. त्याने चार षटकात केवळ 13 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने 3 षटकात 31 धावा दिल्या. पण त्याला विकेट नाही मिळाली.
आयपीएलचा सुपरस्टार गोलंदाज युजवेंद्र चहल सर्वात महागडा ठरला. त्याने 4 षटकात 49 धावा दिल्या आणि फक्त 1 बळी घेतला. अक्षर पटेलने 1 षटकात 19 धावा दिल्या.
कार्तिकने शेवटच्या षटकांमध्ये झटपट फलंदाजी केली. त्याने 19व्या षटकात दोन चौकार आणि 20व्या षटकात दोन षटकार मारले. कार्तिकच्या चांगल्या खेळीमुळे टीम इंडियाने 148 धावा केल्या. दिनेश कार्तिकने 21 चेंडूत 30 धावा केल्या