आज दि.२९ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? ड्रोनमध्ये सापडले बॉम्ब

कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरात आज पहाटे पोलिसांनी पाडलेल्या ड्रोनमध्ये सात स्टिकी बॉम्ब सापडले आहेत. दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेला लक्ष्य केलं जात आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की दहशतवादी यात्रेच्या बसेसवर हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय दुसऱ्या एका पॅकेटमध्ये सात UBGL (अंडर बॅरल ग्रेनेड) देखील आढळून आले आहेत.

हेल्थ इन्शुरन्स ही मोबाईलच्या सीमप्रमाणे पोर्ट करु शकतात

गेल्या काही वर्षांत आरोग्य पॉलिसी घेणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. दिलेला मेडिक्लेम घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्याजवळ हेल्थ पॉलिसी ठेवावी, ती वाईट काळात उपयुक्त ठरू शकते.

जर तुम्ही तुमच्या जुन्या पॉलिसीवर खूश नसाल आणि दुसर्‍या पॉलिसी अंतर्गत बदलण्याची इच्छा असेल तर त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. जुन्या पॉलिसीमधून नवीन हेल्थ पॉलिसीकडे जाणे याला पोर्टिंग म्हणतात. पॉलिसी पोर्ट करण्यासाठी, काही अटी आणि शर्ती मंजूर कराव्या लागतात, त्यानंतर हे काम सहज होते. जुन्या पॉलिसीवरून नवीन पॉलिसीमध्ये पोर्ट करण्यासाठी, प्रथम तुम्हाला ती कंपनी निवडावी लागेल जिथून तुम्हाला नवीन पॉलिसी घ्यायची आहे.

आला रे आला! केरळमध्ये मान्सून दाखल, राज्यातही Rain Alert जारी

सर्वांना प्रतिक्षा लागून राहिलेला मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान मान्सून पूर्व पावसाची उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अंदमानात  १६ मे ला पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर साऊथ इस्टेट मान्सून वाऱ्यांची दिशा लक्षात घेता सर्वसाधारण अंदाजानुसार ५-१० जून पर्यंत कोकणात मान्सून दाखल होणार आहे. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये आज 29 मे 2022 रोजी मान्सून सुरू झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान हवामान खात्याकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत.

ठाण्यात 35 टन साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

ठाण्यातून अपघाताची बातमी समोर येतेय. ठाणे घोडबंदर रोड अपघातासाठी नेहमीच चर्चेत असतो. आज सकाळी ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर एका ट्रकचा मेट्रोच्या पिलरला धडक बसली. या धडकेतून हा अपघात झाला आहे.

या ट्रकमध्ये 35 टन साखर होती. हा ट्रक कोल्हापूरवरुन गुजरातकडे जात असताना हा अपघात झाला. सुरुवातीला हा ट्रक लोखंडी बॅरिकेटला धडकला. त्यानंतर मेट्रोच्या पिलरला ट्रकची धडक बसली. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

IPL 2022 Final : अमित शहा राहणार उपस्थित, नरेंद्र मोदी स्टेडिअमला छावणीचं स्वरूप, 6000 सुरक्षारक्षक तैनात

आयपीएल 2022 स्पर्धेच्या फायनलचे काऊंट डाऊन आता सुरू झाले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये आज (रविवारी) गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स फायनल होणार आहे. या फायनलपूर्वी समारोपाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील फायनलसाठी उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे.

आयपीएल फायनलसाठी उपस्थित राहाणारे केंद्रीय गृहमंत्री तसंच अन्य VIP व्यक्तींच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये 6 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून संपूर्ण स्टेडिअमला त्यामुळे छावणीचं स्वरूप आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयपीएल फायनलसाठी 5000 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1000 होमार्ड तैनात करण्यात आले आहेत.  त्याचबरोबर 17 DCP, 4 DIG, 28 ACP, 51 पोलीस इन्स्पेक्टर आणि 268 सब इन्स्पेक्टर यावेळी सुरक्षेसाठी तैनात असतील.

उन्हाचा फटका, जळगावात उष्माघाताने एकाचा मृत्यू

राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने 45 चा आकडा पार केला होता. सर्वात जास्त तापमान हे विदर्भात नोंदवण्यात आले. जळगाव जिल्ह्यातही तापामानाने उच्चांक गाठला होता. याठिकाणी 43 डिग्रीच्या वर तापमान नोंदवण्यात आले. या उष्णतेच्या वातावरणात उष्माघाताचा एकाला फटका बसल्याचे समोर आले आहे.बहिणीकडे आलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू  झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात घडली. किशोर ज्योतिराम खलपे असे 37 वर्षीय मृताचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील रहिवासी होते. याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी अडवला खा.सुप्रिया सुळेंच्या गाड्यांचा ताफा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात नाराजी नाट्य पाहण्यास मिळाले. नाराज झालेल्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवला. पण, सुप्रिया सुळे यांनी सर्व नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि स्वत: च्या गाडीत कार्यकर्त्यांना बसवून बैठकीला घेऊन गेल्या.

सुप्रिया सुळे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी  सुप्रिया सुळे यांचा ताफा काही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. 

‘शेजाऱ्याच्या घरात जरी पाळणा हलला तरी पेढे वाटायचे’, सदाभाऊंची राष्ट्रवादीवर खोचक टीका

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर टीका केली आहे. शेजाऱ्याच्या घरात जरी पाळणा हलला तरी पेढे वाटायचे, अशा शब्दांमध्ये सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यंतीवर बंदी होती. पण सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरुन आता श्रेयवाद सुरु झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्रयत्नामुळे बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानी दिली, असा दावा केला होता. आता त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या प्रयत्नांमुळे बैलगाडा शर्यतवरील निर्बंध हटले, असा दावा केला आहे.

22 प्रवाशांना घेऊन जाणारं नेपाळचं विमान रडारवरुन Missing, प्रवाशांमध्ये 5 भारतीय

नेपाळहून 22 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या तारा एअरचे ९ एनएईटी ट्विन-इंजिन असलेले विमान बेपत्ता झाले आहे. यात 5 भारतीय नागरिक , 13 नेपाळी प्रवाशी यांचाही समावेश होता. याचबरोबर पोखरा ते जोमसोमला येथे जाणाऱ्या नेपाळी दलातील लष्करी अधिकारी होते.

गेल्या 2 तासापासून या विमानाचा विमातळाशी संपर्क तुटल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली होती. एएनआयच्या वृत्तानुसार तारा एयरच्या या विमानाने आज सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी उड्डाण घेतले होते. विमानाचा शोध घेण्यासाठी एक खासगी विमानही पाठवण्यात आल्याचे नेपाळी दलाच्या प्रवकत्याने सांगितले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.