मागच्या दीड वर्षांपूर्वी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील शेतकरी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले होते. दरम्यान विविध शेतकरी संघटनांना एकसंध बांधण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठे यश मिळवले होते. राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यायला लावण्यात मोठा वाटा होता. राकेश टिकैत पुन्हा आंदोलनाच्या तयारीवर आले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.
टिकैत यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला, बागपतमधील चौगामा भागातील गंगनौली गावात शेतकऱ्यांची पंचायत झाली. या पंचायतीमध्ये बोलताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार जोरदार निशाणा साधला. केंद्रातल्या सरकार एकतर्फी कारभार करत आहे. त्यांना कोणाची जाण राहिली नाही. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला.
बागपत येथील पंचायतीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राकेश टिकैत म्हणाले कि, केंद्रातील सरकार एफआरपीचे दोन तुकडे करत आहे यावर आपल्याला जन आंदोलन उभारून हो मोडीत काढावे लागेल. याचबरोबर शेतीच्या पंपाचे मीटर बसवण्याबाबत सरकारविरोधात आवाज उठवावा लागेल. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे टाळत असून, येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचा इशारा राकेश टिकैत यांनी दिला.
ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आले त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचे काय झाले. सरकार शेतकऱ्यांच्या मुद्दावर कुठेही चर्चा करताना दिसत नाही.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला सरकारविरोधात आंदोलन करताना आपल्याला ट्रॅक्टर मोर्चा काढायचा आहे. सरकारने आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील पण मागे हटायचे नाही असेही ते म्हणाले. आंदोलनाशिवाय सरकारे चालत नाहीत. त्याचबरोबर 29 मे रोजी हरिद्वारमध्ये होणाऱ्या महापंचायतीत शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी राकेश टिकैत यांनी केले.